सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाची कोसळधार सुरू आहे. स्ट्रॉबेरी आनि गुलाबी थंडीचं हिल स्टेशन म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील सातारा नजीक असलेल्या महाबळेश्वरच्या नावावर यंदा नवा विक्रम लिहण्यात आला आहे. यंदा जगात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरमध्ये बरसला आहे. यंदा जून महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसत आहे. बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील पावसाने तब्बल 8000 मीमी (800 सें.मी.) चा टप्पा पार केला आहे. तर महाबळेश्वर येथील पावसाची रेकॉर्डब्रेक 8012.1 मीमी इतकी नोंद झाली आहे. कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणी सरासरी 5530.1 मीमी इतका पाऊस पडतो. मात्र महाबळेश्वर येथील पावसाने बुधवारी जणू काही इतिहासच रचला.
6 सप्टेंबरपर्यंत नोंदवण्यात आलेल्या पावसामध्ये महाबळेश्वर मध्ये सर्वाधिक म्हणजे 7200 मीमी पाऊस बरसला होता. तर आत्तापर्यांत सर्वाधिक पावसाची नोंद असणार्या मेघालयातील मौसिनरामला 6218 मीमी तआणि चेरापुंजी मध्ये 6100 मीमी पाऊस बरसला आहे.
वातावरणामध्ये सतत होत असलेले बदल, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे सध्या सारेच बदलले आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे आणि अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वारे घाट माथ्यावर बरसल्याने यंदा महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याचे TOI शी बोलताना हवामानतज्ञांनी सांगितले आहे. देशात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या नव्या ठिकाणाची नोंद; महाबळेश्वर, ताम्हिणी येथे चेरापुंजीपेक्षाही अधिक पर्जनवृष्टीची नोंद
सामान्यपणे पावसाळ्याच्या पहिल्या 3 महिन्यातच मौसिनरामला 8000 मीमी पाऊस पडतो. पण मागील काही वर्षांपासून तेथील प्रमाण कमी झालं आहे. आता महाबळेश्वरमध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे. अखेर महाबळेश्वरने देखील 8000 मीमी चा टप्पा ओलांडला आहे.