अनधिकृत भोंगे उतरवण्याच्या मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर आता राज्यात अनेक धार्मिक स्थळांवरील प्रार्थना, अजान, आरत्या बंद झाल्या आहे. मुंबईतही काही भागात याचे परिणाम जाणवले आहेत. दक्षिण मुंबई मध्ये 26 मशिदींमध्ये आता रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकरवर अजान देण्यात येणार नाही, असा निर्णय झाल्याचं मनसेने ट्वीट करत सांगितलं आहे. मुस्लिम लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या भेंडीबाजार, मिनार, मदनपुरा, नागपाडा या परिसरातील मशिदींच्या मौलवींनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Loudspeaker Row in Maharashtra: मुंबई मध्ये कायद्यानुसार Industrial area ते Silence Zone मध्ये कधी किती डेसिबल मध्ये लाऊडस्पीकर लावण्यास आहे परवानगी?
दरम्यान काल मनसेने दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये पहाटेच्या अजानवेळेस मनसे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याच्या तयारीमध्ये होती. पण पोलिसांनी स्थिती नियंत्रणामध्ये ठेवत आणि अनेक मशिदींनी सामंजस्याची भूमिका घेत भोंग्यांशिवाय पहाटेची अजान दिली आहे. नक्की वाचा: Loudspeaker Row In Maharashtra: मनसेच्या 'भोंगे आंदोलना'चा हिंदू मंदिरांनाही फटका, पंढरपूर, शिर्डीसह अनेक ठिकाणी निर्बंध, भाविक ना'राज'.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचा निर्धार या मशिदींच्या विश्वस्तांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे.#ध्वनिप्रदूषण #सामाजिक_सलोखा #MNSAdhikrut
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 5, 2022
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरेंनी अनधिकृत मशिदींवरील भोंगेही अनधिकृत मग पोलिस त्यांना अधिकृत परवानगी कशी देणार? असा सवाल विचारण्यात आला आहे. तर 1400 मशिदींपैकी 135 मशिदींनी काल पहाटे सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवत भोंग्यांवर अजान दिली त्यांच्यावर पोलिस काय कारवाई करणार? असा सवाल विचारला आहे. पण ज्या मौलवींनी सामंजस्याची भूमिका घेतली त्यांचं कौतुक मनसे कडून करण्यात आले आहे.