वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मानले जाणा-या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या लगबग सुरु आहे ती लवकरच येणा-या कार्तिकी एकादशीची. याच पार्श्वभूमीवर या समितीने विठू-रखुमाईचे मंदिर 24 तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून (30 ऑक्टोबर) देवाचे नित्योपचार बंद झाले असून प्रक्षाळपूजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले ठेवण्यात आले आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आता भाविकांना 24 तास विठूरायाचे दर्शन घेता येणार असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
वारकरी संप्रदायात आषाढी,कार्तिकी,माघी आणि चैत्री वारील अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या भाविकाला आषाढी वारीला पंढरीला येता आले नाही तो भाविक हमखास कार्तिकी वारीला येतो. या कार्तिकी वारीसाठी मुंबई,कोकण,विदर्भ ,मराठवाडा येथून भाविक दरवषी न चुकता येतो. या कार्तिकी वारीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची तयारी अंतिम त्प्प्यत आली आहे.
हेदेखील वाचा- Pandharpur Wari 2019:चंद्रभागा नदीच्या तीरावर महिला भाविकांसाठी 20 फिरती चेजिंग रूम्स
30 ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल आणि रुक्मिनिमातेचे दर्शन 24 तास करण्यात आले. बुधवारी महानैवैद्यानंतर विठोबा-रखुमाईच्या मूर्तीमागे मऊ असा लोड ठेवण्यात आला आहे. 24 तास भक्त दर्शनासाठी येणार त्यांचे येण्याने विठू-रखुमाई थकून जाऊ नये यासाठी हा लोड ठेवण्यात आला आहे. तसेच विठोबाचा शेजघरातील पलंग देखिल काढण्यात आलेला आहे.
विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरु राहणार असल्याने काकड आरती, शेजारती, दुपारती आणि पोशाख हे सर्व नित्योपचार काही दिवस बंद राहणार आहे. केवळ रोज नित्यपूजा केली जाणार आहे.