भारतामध्ये लोकसभा निवडणूका आताअवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. येत्या काही तासांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना नागपूर मध्ये सामाजिक संस्था नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासाठी लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Polls) बिनविरोध करावी या मागणीसाठी पुढे सरसारवले आहेत. केंद्रीय मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी आपल्या चोख कामासाठी सर्वशृत आहेत. दुजाभाव न करता सार्यांसाठी कामाला उपलब्ध असलेले मंत्री म्हणून त्यांची ओळख असल्याने सार्याच पक्षातील राजकीय मंडळी त्यांची स्तुती करतात मग असा लोकप्रतिनिधी लोकसभेत बिनविरोध निवडून जावा अशी मागणी काही सामाजिक संस्था करत आहेत. यासाठी ते विरोधी पक्षातील नेत्यांना भेटून नितीन गडकरींविरूद्ध उमेदवार न देण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न करणार असल्याचे देखील समोर आले आहे. सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी दत्ता शिर्के यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान भाजपाच्या पहिल्या यादी मध्ये नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश नव्हता. यावरूनच उद्धव ठाकरेंनी गडकरींचा भाजपा मध्ये अपमान होत असेल तर आमच्यासोबत यावं आम्ही मविआ कडून त्यांना निवडून आणू असं म्हटलं होतं. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंचं हे विधान हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर पक्षात तिकीट जाहीर करण्याची पद्धत आहे त्यानुसारच ते जाहीर होईल असं म्हटलं आहे. नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करतात. Nitin Gadkari On Lok Sabha Election Campaign: 2024 च्या लोकसभा निवडणूकीत ना बॅनरबाजी ना चहा देणार; पुन्हा गडकरींनी सांगितला 'ब्राईब फ्री' प्लॅन .
नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आहेत. नागपूर सह देशभरामध्ये त्यांनी रस्ते, पूल बांधून दळणवळण सुकर करण्याचं भरीव काम केले आहे. केवळ रस्त्यांची उभारणी नव्हे तर प्रवास सुरक्षित करण्यासाठी देखील त्यांनी विशेष काळजी घेतली आहे. त्यमुळे जनसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे. रस्ते उभारणीच्या कामातही त्यांनी अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स केले आहेत.