Uddhav Thackeray, Nitin Gadkari (फोटो सौजन्य - फेसबुक)

Uddhav Thackeray On Nitin Gadkari: शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना ‘अपमानित’ होत असल्यास भाजप (BJP) सोडण्याचे आवाहन केलं आहे. पूर्व महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कृपाशंकर सिंग, ज्यांना भाजपने एकेकाळी (कथित भ्रष्टाचारावरून) लक्ष्य केले होते, त्यांच्यासारखे लोक भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत आहेत. मात्र, नितीन गडकरींचे नाव पहिल्या यादीत नाही.

मी हे दोन दिवसांपूर्वी गडकरींना सांगितले होते. आजही मी त्याची पुनरावृत्ती करत आहे. तुमचा अपमान होत असेल, तर भाजप सोडा आणि महाविकास आघाडीत सामील व्हा. तुमचा विजय निश्चित करा. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही तुम्हाला मंत्री करू आणि ते अधिकार असलेले पद असेल, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना केलं आहे. (हेही वाचा -Mahadev Jankar on Gopinath Munde: पंकजा मुंडे यांच्यापेक्षा माझी वाताहत अधिक, महादेव जानकर असं का म्हणाले?)

गेल्या आठवड्यात, ठाकरे यांनी गडकरींना विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या ऑफरला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेना (यूबीटी) प्रमुखांची खिल्ली उडवली होती. फडणवीस यांनी म्हटलं होतं की, रस्त्यावरील माणसाने एखाद्याला अमेरिकेचे अध्यक्ष बनवण्याची ऑफर दिली आहे. गडकरी हे भाजपचे प्रमुख नेते होते, परंतु पहिल्या यादीत महाराष्ट्रातील नावे नव्हती. कारण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली नव्हती, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे. (वाचा -Vasant More Quits MNS: मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे यांचा राज ठाकरे यांना राजीनामा देत 'जय महाराष्ट्र'!)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यातील नियमांच्या अधिसूचनेला निवडणूक जुमला म्हटले. हिंदु, शीख, पारशी आणि इतर (शेजारील देशांतून) भारतात येणाऱ्यांचे स्वागत आहे, परंतु लवकरच निवडणुका जाहीर होणार असल्याने अधिसूचनेची वेळ संशयास्पद होती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कलम 370 रद्द करून चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत. काश्मिरी पंडित अद्याप काश्मीरमध्ये त्यांच्या घरी परतले नाहीत, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.