मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' विरुद्ध भाजपचे 'बघाच तो व्हिडिओ'
MNS chief Raj Thackeray and Bjp Mumbai Chief Ashish Shelar | (file photo)

Lok Sabha Elections 2019: 'लाव रे तो व्हिडिओ' असे म्हणत पंतप्रधन मोदी (Pm Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) कारभाराची पोलखोल करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरुद्ध भाजपने 'बघाच तो व्हिडिओ' असे कँम्पेन सुरु केले आहे. मुंबई भाजपने मंबईतील वांद्रा येथील रंगशारदा सभागृहात भाजपने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत मनसेच्या कँम्पेनला भाजपने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

या परिषदेमध्ये भाजपने राज ठाकरे यांच्या भाषणाच्या काही जुन्या व्हिडिओ क्लिप्स दाखवल्या. यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्याबद्धल काय बोलले होते. ठाकरे यांनी भुजबळ यांच्यावर कशी टीका केली होती, याबाबतचे हे व्हिडिओ होते. (हेही वाचा, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेना पक्षाच्या मंचावर उपस्थिती, राजकीय चर्चांना उधाण)

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या वेळी बोलताना शेलार म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल म्हणजेच राज ठाकरे. खोट्या आणि अर्धवट माहितीवर आधारीत राजकारण करण्याची राज ठाकरे यांची प्रवृत्ती आहे, असे सांगतानाच ‘मित्रा तू खरचं चुकलास’, असेही आशिष शेलार म्हणाले.