Sharad Pawar, Parth Pawar, Ajit Pawar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maval Lok Sabha constituency: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू तसेच, पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2019) रिंगणात उतरणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच पुणे येथील पत्रकार परीषदेत तसे संकेत दिले. पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी पक्षातून मोठ्या प्रमाणावर आग्रह होता असी पुस्तीही पवार यांनी या वेळी जोडली.

विशेष म्हणजे मावळ मतदारसंगातून पार्थ पवार यांचे नाव चर्चेला येताच स्वत: शरद पवार यांनीच त्या नावाला विरोध केला होता. लोकसभा निवडणूकीत पवार कुटुंबीयांतून मी आणि सुप्रिया सुळे असे दोघेच निवडणूक लढवू असे पवार यांनी म्हटले होते. पवार यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून या मतदारसंघातून इतरही अनेक नावे पुढे आली होती. मात्र, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकतून मोठ्या प्रमाणावर लॉबींग करण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी आणि घोषणाबाजी केली होती. त्यामळे पार्थ यांच्या उमेदवारीसाठी नेतृत्वावर तयार केलेला दबाव कायम होता. (हेही वाचा, शरद पवार माढा येथून निवडणुक लढवणार नाहीत?)

दरम्यान, पवार कुटुंबीयांतून किती लोक निवडणूक लढवणार असा सवालही पवार यांनी या वेळी उपस्थित केला. मात्र, पक्षातून पार्थ पवार यांच्या नावासाठी जोरदार आग्रह होता. असे असले तरी त्यांच्या उमेदवारी संबंधी प्रदेशाध्यक्षच निर्णय घेतील असेही, पवार यांनी या वेळी सांगितले.