आचारसंहिता उल्लंघन: भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
BJP MLA from Belapur Manda Mhatre asked voters to Vote twice for NDA candidate in Lok Sabha elections 2019 (Photo Credits: Facebook/Manda Mhatre)

Lok Sabha Elections 2019: दोनदा मतदान करण्याचा सल्ला कार्यकर्ते आणि मतदारांना देणं भाजप आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre)यांना चांगलाच महागात पडला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघन (Code of Conduct Violation) केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा मतदारसंघात २३ मे रोजी मतदान झाल्यानंतर पुन्हा २९ तारखेला नवी मुंबईत मतदान करण्याचा सल्ला आमदार म्हात्रे यांनी दिला होता. हे वक्तव्य म्हणजे अचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भाजप आमदार मंदा म्हात्रे या शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात नवी मुंबई शहरातील कौपरखैरणे येथे बोलत होत्या. कौपरखैरणे परिसरात सातारा, शिरूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कोपरखैरणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार यांच्यासाठी हा संयुक्त असे या मेळाव्याचे स्वरुप होते. या मेळाव्यात बोलताना म्हात्रे यांनी हा सल्ला दिला. मात्र, आपण काहीतरी चुकीचे बोलल्याचे ध्यानात येताच 'राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील असाच सल्ला यापूर्वी दिला होता' असे सांगत म्हात्रे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: अविवाहितांचे प्रतिनिधित्व पार्थ पवार करतील, अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण)

या मेळाव्यासाठी युतीचे नेते आणि युतीच्या उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी बोलताना युतीचे सातारा येथील उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची यांनी देशात लोकशाही असली तरी, साताऱ्यात मात्र राजेशाहीच नांदत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.