Lok Sabha Elections 2019: अविवाहितांचे प्रतिनिधित्व पार्थ पवार करतील, अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण
अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits- Facebook )

Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून मावळ (Maval) येथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पहिले भाषण सुद्धा केले. मात्र त्यानंतर पार्थ पवार यांनी केलेल्या भाषणामुळे त्यांना सोशल माडियावर ट्रोल करण्यात आले. परंतु पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी पाठराखण करत असे म्हटले आहे की, पार्थ हे अविवाहितांचे प्रतिनिधित्व करतील. त्यासाठी पार्थ यांना अधिकाधिक मतादांनी निवडणुन द्या असे आवाहन अजित पवार यांनी पिंपरी येथे जनतेला केले आहे.

लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना निवडणुक देण्यासाठी अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर पिंपरी येथे आजोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेवेळी पवार यांनी असे म्हटले की, अविवाहितांचे प्रतिनिधीत्व कोण करणार? त्यासाठी लोकसभेत अविवाहित प्रतिनिधी असणे महत्वाचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.(हेही वाचा-मनोहर पर्रिकर यांना राफेल कराराचा व्यवहार मान्य नसल्याने सोडले होते संरक्षण मंत्रीपद - शरद पवार)

पार्थ पवार यांच्या विरुद्ध मावळ येथून श्रीरंग बारणे निवडणुक लढवणार आहेत. तसेच बारणे हे दहावी नापास असल्याचे ही अजित पवार यांनी सभेत म्हटले. तसेत केंद्रात बारावी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या स्मृती ईराणी यांच्यावर सुद्धा अजित पवार यांनी टीका केली. त्यामुळे उच्चशिक्षित उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.