मुंबई कोपर (Kopar Railway Station) स्टेशनवर काल रात्री बिकानेर - यशवंतपूर ट्रेन ( Bikaner-Yeshwantpur ) जाताना एक मोठा अपघात टळला. रात्री 11च्या सुमारास सिग्नल यंत्रणा कार्डबोर्डने झाकला होता. मात्र वेळीच लोको पायलटने प्रसंगवधान राखल्याने भविष्यातला मोठा गैरप्रकार टळला. सिग्नल (signal) झाकून ठेवण्याचा प्रकार ही मुद्दामून केला होता की खरंच त्यामध्ये बिघाड होता याबद्दल अधिक तपास सुरू आहे.
बी एस नारायण (Loco pilot BK Narayan) या लोको पायलटने सिग्नल कार्ड बोर्डने झाकलेला पाहिल्यानंतर ट्रेन थांबवली. बी एस नारायण हे 2000 पासून भारतीय रेल्वेमध्ये काम करत आहेत. त्यांना लोकेशन, तेथील सिग्नल ठाऊक आहेत. RPF आणि GRP याबद्दल अधिक तपास करणार आहेत. 2008 पासून ते पायलट म्हणून काम करत आहेत. मुंबई - दिल्ली राजधानी एक्सप्रेस पाठोपाठ, सिद्धेश्वर एक्सप्रेस सह 6 एक्सप्रेस ट्रेनचा वेग वाढला, पहा नव्या वेळापत्रकानुसार CSMT, पुणे येथे एक्सप्रेस ट्रेन्स कोणत्या वेळेत येणार
अलर्ट दिल्यानंतर तात्काळ तेथे संबंधित व्यक्ती पोहचल्या. RPF च्या लोकांनी यामध्ये सिग्नलवर टाकलेला बॉक्स काढला. आजूबाजूच्या भागामध्ये थोडा शोध घेतला मात्र त्यांना संशयित काहीच सापडलं नाही. अखेर तो बॉक्स डोंबिवली स्टेशनमध्ये आणण्यात आला. हा प्रकार ज्यांनी केला असेल त्याचा शोध घेऊन संबंधित व्यक्तीला योग्य शिक्षा दिली जाईल असे सांगण्यात आले आहे.