Representational Image (Photo Credits: PTI)

Revised Arrival Timings of Express Trains at CSMT Mumbai and Pune: मध्य रेल्वेच्या प्रवाशांना अधिक आरामदायी आणि जलद प्रवास करता यावा याकरिता प्रयत्न करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मुंबई, पुणे मार्गावर धावणार्‍या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रामुख्याने तुळजापूर(Tuljapur), अक्कलकोट (Akkalkot), पंढरपुर अशा महाराष्ट्रातील तीर्थस्नानी दर्शन घेण्यासाठी सिद्धेश्वर एक्सप्रेसने (Siddheshwar Express ) प्रवास करणार्‍या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे.  सिद्धेश्वर  एक्सप्रेसचा वेग 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता सिद्धेश्वर एक्सप्रेस सोबतच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत.

काय असेल एक्सप्रेस ट्रेनचं नवे वेळापत्रक ?

  • 12116 सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री 22.40 वाजता सुटेल. तर सकाळी 6.50 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनलला पोहचणारी ही ट्रेन आता 6.35 ला पोहचणार आहे. दौंड ते मुंबई दरम्यान या ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे.
  • 61002 डोंबिवली - बोईसर (MEMU)ट्रेन डोंबिवली स्थानकातून 5.30 वाजता सुटेल.
  • 12112 अमरावती मुंबई एक्सप्रेस नव्या वेळापत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्टेशनमध्ये 6.25 वाजता पोहचणार आहे. यापूर्वी ती 6.45 ला पोहचत होती.

    17412 कोल्हापूर - मुंबई एक्सप्रेस सकाळी 7.35 ऐवजी आता 7.25 ला येणार आहे.

  • 2138 फिरोझपूर - मुंबई पंजाब मेल आता नव्या वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर 7.45 ला पोहचणार आहे.
  • 17317 हुबळी - लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस पुण्यामध्ये 02.55 ला पोहचणार आहे तर पुण्याहून 3 वाजता सुटणार आहे.
  • 16588 बिकानेर - यशवंतपूर एक्सप्रेस पुण्याला 2.10 वाजता पोहचेल तर पुण्याहून ही ट्रेन 2.15 ला रवाना होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई -दिल्ली दरम्यान धावणार्‍या एक्सप्रेस ट्रेनचाही वेळ कमी करण्यात आला आहे. मुंबईहून एक्सप्रेस ट्रेनने नियमित हजारो लोकं प्रवास करत असतात.आता मध्य रेल्वेकडून हा प्रवास थोडा अधिक सुखकर आणि जलद केल्याने प्रवाशांमध्ये आनंदांचं वातावरण असेल.