महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन (Lockdown In Maharashtra) लागू झाल्यापासून ते आतापर्यंत म्हणजे 22 मार्च ते 7 जून या कालावधीत कलम 188 नुसार 1,23, 637 गुन्हे नोंद झाले आहेत या अंतर्गत 23, 893 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. आणि या विविध गुन्ह्यांसाठी 6 कोटी 78 लाख 9 हजार 891 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. यापैकी बहुतांश गुन्हे हे पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांच्या विरोधात आहेत. सविस्तर आकडेवारी पाहायची झाल्यास, लॉकडाउन काळात ठिकठिकाणी पोलिसांवर हल्ला होण्याच्या 262 घटना घडल्या यातील 845 व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.कोरोना व्हायरस संदर्भातील महाराष्ट्रासह देशभराचे अपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
दुसरीकडे, अवैध वाहतूक करणाऱ्या 1332 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यातील 80,532 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. दरम्यान, राज्यात मुंबई मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 60 हजार 318 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत. तसेच 5 लाख 86 हजार व्यक्तींना कॉरंटाईन करण्यात आले आहे. या विलगीकरणातील व्यक्तींना बाहेर जाण्याची परवानगी नाही मात्र तरीही बाहेर पडणाऱ्या 718 जणांना दंड आकारण्यात आला आहे.
Sonu Sood याने घेतली Uddhav Thackeray यांचा भेट; Sanjay Raut यांनी केले खोचक ट्विट - Watch Video
महाराष्ट्रात सद्य घडीला कोरोनाबाधितांची संख्या 85 हजारावर पोहचली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 85, 975 पोहचली आहे. यापैकी 43, 591 कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील कोविड विशेष रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आजवर 3,060 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून 39, 314 जण हे या संकटातून बरे होऊन मुक्त झाले आहेत.