प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या कुरणेवाडी गावात मोठी दुर्घटना घडली आहे. शेतात काम करीत असताना मजुरांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक अत्यवस्थ झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. जखमीवर तालुक्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. तसेच त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

बाळासो घोरपडे आणि संगीता घोरपडे असे मृत व्यक्तींची नावे आहेत. तर, पद्मिमीनी घोरपडे यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु आहेत. हे तिघेही आपल्या नेहमीच्या नित्यनियमाप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. शेतात शेतमजूरही काम करत होते. शेतात काम सुरु असाताना पावसाची संततधार सुरु होती. याचदरम्यान, बाळासो, संगीता आणि पद्मिमीनी यांच्या अंगावर वीज कोसळली. ज्याच बाळासो आणि संगीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर, पद्मिमीनी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बारमतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच त्यांची प्रकृती चिंताजनक आहेत. हे देखील वाचा- CM Fund Scam द्वारे स्वत:च्या खात्यात 89 लाख रुपये जमा करणाऱ्या ठाण्यातील डॉक्टरला बेड्या

नागपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरच्या या घटनेत 2 खेळाडूंचा तर, तरोडीमध्ये एता शेतमजुराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले होते.