Fire at Hotel Ripon Palace in Mumbai (Photo Credits: ANI)

दक्षिण मुंबईच्या नागपाडा (Nagpada) परिसरातील बेलासिस रोडवरील रिपन हॉटेल (Rippon Hotel) मध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे. ही आग हॉटेलच्या लॉजिंग रूममध्ये लागली जिथे कोरोना व्हायरस संबंधीच्या पेशंट्सना वेगळे ठेवण्यात आले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. सध्या तरी या आगीला हॉटेलच्या लॉजिंग रूमपुरतेच मर्यादित ठेवण्यात यश आले आहे. या ठिकाणच्या बहुतेक रूग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, हरवलेल्या व्यक्तींसाठी शोध मोहीम सुरू आहे.

एएनआय ट्विट -

या आगीमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती मिळू शकली नाही, तसेच ही आग नक्की कशामुळे लागली हेही समजू शकले नाही. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता डॉक्टरांच्या पथकालाही घटनास्थळी  पाचारण करण्यात आले आहे. या ठिकाणाहून आग आटोक्यात आणून, 25 रुग्ण आणि 2 कर्मचार्‍यांसह एकूण 27 जणांची सुटका करण्यात आली आहे. सध्या कूलिंग ऑपरेशन चालू आहे.

(हेही वाचा: Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांचा महत्वाचा निर्णय; कोरोना व्हायरस संक्रमित पोलिसांना उपचारांसाठी अ‍ॅडव्हान्समध्ये देणार 1 लाख रुपये)

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर Kishori Pednekar यांचा स्वतःहून क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय - Watch Video

दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या घटन पाहता लॉक डाऊन कडक करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉक डाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी प्रशासनाला तसे निर्देश देण्यात आले आहेत.