ठाण्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत दिसून आली आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील घोडबंदर रोड येथील काजू पाडा गावातील एका शेतात एक बिबट्या घुसला होता. यावेळी या बिबट्याने तिथली कोंबडी घेऊन पळ काढला. एका व्यक्तीने बिबट्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. साधारण 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये बिबट्या कोंबडीजवळ येताना दिसत आहे. त्यानंतर तो कोंबडीला घेऊन पळ काढतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा: टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी औरंगाबाद येथील शेतकऱ्याने शेतात बसवले सीसीटीव्ही कॅमेरे; व्हिडिओ व्हायरल)
Viral | Leopard was spotted at Ghodbunder Road in Thane. Watch it grab a chicken & run away. pic.twitter.com/iM3RR4JjAC
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)