Tomato Theft: टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी औरंगाबाद येथील शेतकऱ्याने शेतात बसवले सीसीटीव्ही कॅमेरे; व्हिडिओ व्हायरल (Watch)
Tomato Theft (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या देशात टोमॅटोचे (Tomato) भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात टोमॅटो चोरीला जाण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी टोमॅटोच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात केले असल्याच्या बातम्या आल्या आहेत. आता महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका शेतकऱ्याने टोमॅटोवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

शरद रावते असे या शेतकऱ्याचे नाव आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने गेल्या 10 दिवसांत रावते यांच्या शेतातून 20 ते 25 किलो टोमॅटो चोरीला गेला आहे. अशा परिस्थितीत टोमॅटोच्या चोरीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने रावते यांनी आपल्या शेतात कॅमेरे बसवले. टोमॅटोचा भाव पूर्वी 22 ते 25 रुपये किलो होता, मात्र आता तो 100 ते 200 रुपये किलोने विकला जात आहे.

शरद रावते यांनी सांगितले की, त्यांचे शेत 5 एकरात पसरले आहे. यामध्ये त्यांनी 1.5 एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. या पिकाद्वारे ते 6 ते 7 लाख रुपये कमवू शकतात. आता लवकरच शेतात दुसरे पीक येणार आहे. मात्र अचानक शेतातील टोमॅटो चोरीला जाण्याच्या घटना समोर येऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी 22 हजार रुपये खर्चून शेतात सीसीटीव्ही बसवले. हे कॅमेरे सौरऊर्जेवर चालतात, त्यामुळे त्यांना वीज पुरवठ्याची काळजी करण्याची गरज नाही. ते त्यांच्या फोनवरून शेतीचे निरीक्षण करू शकतात. (हेही वाचा: Tomato Price Hike: टोमॅटोच्या उत्पादन मोठी घट, बाजारभाव पुन्हा गगनाला भिडणार)

दुसरीकडे, महाराष्ट्रातील नाशिक येथील अब्दुल गनी सय्यद या शेतकऱ्यानेही टोमॅटोच्या झाडांच्या रक्षणासाठी त्यांच्या शेतात तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशननुसार, चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा टोमॅटो उत्पादक देश आहे.