Leopard | Image used for representational purpose (Photo Credits: Facebook/Big Cat Rescue)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lock Down) काळात अनेक प्राणी पक्षी मुक्तपणे रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. कुत्रा, मांजर, अशा पाळीव प्राण्यांच्या सोबतच आता तर जंगलातील प्राणी सुद्धा काही ठिकाणी रस्त्यावर दिसून येत आहेत. असाच एक चित्ता (Leopard) रत्नागिरी (Ratnagiri) मधील आंबव (Aambav) गावच्या रस्त्यांवर हिंडताना दिसून आला होता. काही वेळाने याच भागात चित्त्याला एकी माकड दिसला आणि या माकडाची शिकार करण्यासाठी चित्त त्याच्या पाठलाग करू लागला. जीव वाचवण्यासाठी माकड जवळच्याच एका विजेच्या खांबावर चढला आश्चर्य म्हणजे या माकडाच्या मागे चित्ता सुद्धा या खांबावर चढला. अशावेळी दुर्दैव असे की दोघांनाही विजेच्या तारांमध्ये अडकून शॉक लागला आणि त्यातच माकड आणि चित्ता  दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेबाबत एका ट्विटर युजरने ट्विट करून माहिती दिली आहे. आंबव गावच्या राजेंद्र माने इंजिनिअरिंग कॉलेजच्या लगतच्या भागात विजेच्या खांबावर चित्त मारून पडल्याचे दिसून आले, यावेळी स्थानिकांनी या चित्त्याचे फोटो काढून सोशल मीडियावरून शेअर केले. तसेच या घटनेच्या बाबत तात्काळ वन्य विभागला कळवण्यात आले. यवतमाळ येथे वाघिणीचा गायीवर हल्ला, वन विभागाने उपाययोजना करण्याची गावकऱ्यांकडून मागणी

पहा ट्विट

दरम्यान या घटनेनंतर वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेतली. यावेळी चित्त आणि माकडाचे शव खाली उतरवण्यात आले. याबाबत पुढील सविस्तर तपास सुरु आहे.