लातूर: भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी मूर्ती विसर्जनाऐवजी केल्या दान; पालिका प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
Latur Ganeshotsav (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामध्ये कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पूराच्या वेढ्यात अडकलेले लाखो लोक बेघर झाले आहेत. एकीकडे ओल्या दुष्काळामुळे नागरिक त्रस्त आहेत तर लातूरमध्ये सुका दुष्काळ असल्याने यंदा गणपती विसर्जन पाण्यात न करता मूर्ती दान करण्यात आलं आहे. यंदा गणेशोत्सवाच्या दरम्यान लातूरकरांना गणेश मुर्ती पाण्यात विसर्जन न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी आपल्या गणेशमूर्ती दान केल्या आहेत. लातूर जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात या मूर्त्या जमा करण्यात आल्या आहेत. Ganeshotsav 2019: लातूर शहरात यंदा गणपती विसर्जन नाही; भीषण पाणीटंचाईमुळे मूर्ती दान करण्याचे अवाहन

लातूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाई आहे. शहरात अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तलावातही पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेले पाणी अधिक काळापर्यंत लोकांना वापरता यावे े यासाठी ते जपून वापरले जात आहे. यंदा गणेश विसर्जन पाण्यात न करता गणेश मूर्ती दान करण्यात याव्यात, असे अवाहन प्रशासनाने केले आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. लातूरमध्ये यंदा गणेशोत्सवाच्या मिरवणूका निघाल्या मात्र विसर्जन पारंपारिक पद्धतीने न करता त्यांचे दान करण्यात आले.

ANI Tweet

गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांनी बाप्पाच्या मूर्त्या परत घेतल्या तर द्या, अथवा इतर गणेश भक्तांना जरुर दान करा. अगदीच अशक्य होत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून त्या महापालिकेकडे दान करा. परंतू, कोणत्याही स्थितीत गणेश मूर्ती विसर्जनाचा हट्ट धरु नका, असे पालिकेने आपल्या अवाहनात म्हटले होते.