Ganeshotsav 2019: लातूर शहरात यंदा गणपती विसर्जन नाही; भीषण पाणीटंचाईमुळे मूर्ती दान करण्याचे अवाहन
Ganpati Immersion | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

Water scarcity in Latur: लातूरकरांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. लातूर (Latur) शहरातील पाणीटंचाई (Water Scarcity) इतकी भीषण आहे की, यंदा त्याचा परिणाम गणपती विसर्जनावरही झाला आहे. विसर्जनासाठी पाणीच नसल्याने यंदा गणेश मूर्ती विसर्जीत न करता त्या दान करण्याचे अवाहन लातूर महापालिका (Latur Municipal Corporation) करत आहे. लातूर शहराला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेशोत्सवाची शतकी परंपरा लाभलेल्या या शहरात गणेशोत्सव (Ganeshotsav ) प्रतिवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. गणपती आगमन मिरवणुकीपप्रमाणेच या शहरातील गणपती विसर्जनही (Ganpati Immersion) आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. पाणीटंचाईमुळे गणपती विसर्जन कर करण्याचा निर्णय घेण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे.

लातूर शहरात पाणीटंचाईची समस्या आज निर्माण झाली नाही. गेली अनेक वर्षे लातूरकर पाणीटंचाईचा सामना करत आहेत. एका वर्षी तर लातूर शहराला थेट रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाही अशीच स्थिती आहे. त्यामुळे संभाव्य स्थिती टाळण्यासाठी किंवा काही अंशी पुढे ढकलण्यासाठी लातूर महापालिका प्रशासन सावध पावले टाकत आहे. या सावधानतेचाच भाग म्हणून सध्या उपलब्ध असलेले पाणी भिविष्यात अधिक काळापर्यंत वापरण्यास मिळावे यासाठी ते जपून वापरले जात आहे. म्हणूनच यंदा गणेश विसर्जन न करता गणेश मूर्ती दान करण्यात याव्यात, असे अवाहन पालिकेतर्फे केले जात आहे.

दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुका जरुर काढाव्यात. परंतू, गणेश विसर्जन करुन या मिरवणुकीची सांगता न करता ती गणेश मूर्ती दान करुन करावी असा विचार आहे. लातूर शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर परिसरातील विहिरी पाणी नसल्यामुळे कोरड्याठाक पडल्या आहेत. तलावही आटले आहेत किंवा त्यातील पाणी पातळी कमालीची घटली आहे. (हेही वाचा, Ganeshotsav 2019: मुलूंडमधील या गणपतीला अर्पण केले जातात फक्त वही-पेन, अमोल सलगर यांच्या कुटूंबियाचा अभिनव उपक्रम)

गणपती विसर्जनाचा हट्ट धरु नये

दरम्यान, पालिकेने गणपती मंडळ आणि गणेशभक्तांना अवाहन केले आहे की, गणपती मिरवणुका काढा पण गणपती विसर्जनाचा हट्ट धरु नका. प्रत्येकाने गणेशमूर्ती दान करावी. तसेच, गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांनी या मूर्त्या परत घेतल्या तर त्या त्यांना अथवा इतर गणेश भक्तांना जरुर दान करा. अगदीच अशक्य होत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून त्या महापालिकेकडे दान करा. परंतू, कोणत्याही स्थितीत गणेश मूर्ती विसर्जनाचा हट्ट धरु नका, असे पालिकेने आपल्या अवाहनात म्हटले आहे.