Lalbaugcha Raja 2024 First Look (फोटो सौजन्य - ANI)

Anant Ambani Donates Gold Crown to Lalbaugcha Raja: उद्यापासून देशभरात गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) सुरुवात होत आहे. मुंबईमधील लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) हा एक प्रसिद्ध गणपतींपैकी एक आहे. काल संध्याकाळी यंदाच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली. त्यावेळी गणेशाच्या मूर्तीला 20 किलो सोन्याचा मुकुट घातलेला दिसून आला. अहवालानुसार, मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि रिलायन्स फाऊंडेशनने हा मुकुट लालबागच्या राजाला भेट दिला आहे. या मुकुटाची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा लालबागच्या राजाला मखमली पोशाख आणि खऱ्या दागिन्यांमध्ये सजवण्यात आले आहे. यामध्ये सोन्याचा मुकुट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

'लालबागचा राजा' मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे म्हणाले की, काल अंबानी कुटुंबाने दान म्हणून 20 किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण केला. पहिल्या दर्शनानंतर राजाला हा मुकुट देण्यात आला. अंबानी कुटुंब मंडळाशी प्रदीर्घ काळापासून जोडले गेले आहे आणि त्यांची गणपती बाप्पावरील भक्ती पाहून आम्हाला अभिमान वाटतो. या मुकुटाचे काम पूर्ण करण्यासाठी कारागिरांना अंदाजे 2 महिने लागले.  (हेही वाचा: Anant Ambani in Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal: अनंत अंबानी लालबागचा राजा मंडळाचे मानद सदस्य)

अनंत अंबानीने लालबागच्या राजाला दान केला 20 किलो सोन्याचा मुकूट-

कोरोनाच्या काळात लालबागचा राजा समितीची आर्थिक परिस्थिती बिकट असताना अनंत अंबानीने त्यांना खूप मदत केली होती. अनंत अंबानीचे योगदान लक्षात घेऊन त्यांना लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मानद सदस्यत्व देण्यात आले आहे. लालबागचा राजा हा मुंबईची शान असून या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी असंख्य भक्त  राजा चरणी पैसे, सोने, चांदीच्या रुपात काही ना काही गोष्टी दान करतात. दरम्यान, लालबागच्या राजाची स्थापना 1934 साली करण्यात आली होती. त्यावेळी होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपात 'श्री'ची स्थापना झाली. येथूनच 'नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली.