लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राबवून सरकारने केवळ आपल्या बहिणींनाच खूश केले नाही तर, त्यांच्या दाजींचीही सोय केली आहे. होय, वाचण्यास काहीसे वेगळे वाटत असले तरी, कथीतरित्या असे घडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे या प्रकाराकडे लक्ष वेधले गेले आहे. सरकारच्या एका तरुण लाडक्या बहिणीने योजनेचा लाभ घेतला. मात्र, या लाभापोटी मिळालेल्या पैशांवर तिच्या बॉयफ्रेंडने (Boyfriend) कथितरित्या डल्ला मारला. धक्कादायक म्हणजे हे पैसे घेऊन बॉयफ्रेंड चक्क गायब (Boyfriend Absconds) झाला आहे. त्याने तिला सोशल मीडिया आणि फोनवर देखील ब्लॉक केले आहे. त्यामुळे कथीत गर्लफ्रेंड असलेली ही तरुणी भलतीच व्यथीत (Girlfriend-Boyfriend Relationship) झाली असून, तिने आपली कैफीयत मांडण्यासाठी हटके पद्धत वापरली आहे.
पैशांच्या नोटेवरुन बॉयफ्रेंडला संदेश?
लाडकी बहीण योजना लाभार्थी असलेल्या या तरुणीने आपली कैफीयत मांडण्यासाठी आणि गणेश नामक कथीत बॉयफ्रेंडशी संपर्क साधण्यासाठी नामी शक्कल लडवली आहे. तिने चक्क पैशाच्या नोटेचा वापर केला आहे. अर्थात या नोटेच्या मुल्याबाबत निटशी माहिती कळत नाही. कारण त्यावरचा आकडा दिसत नाही. म्हणजेच ती नोट किती रुपयांची आहे हे लक्षात येत नाही. मात्र, त्या नोटेचा क्रमांक मात्र स्पष्ट दिसतो आहे. तरुणीने 8BE 390368 या क्रमांकाच्या नोटेवर एक खास संदेश लिहीला आहे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, सदर क्रमांकाची मालिका आणि नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे छापली गेली आहे किंवा नाही याबाबत लेटेस्टली मराठीने पडताळणी केलेली नाही. त्यामुळे संदेशवहनासाठी सदर नोटेचा वापर करण्यात आला आहे किंवा नाही याबाबत अनभिज्ञता आहे. पण, हा प्रकार मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणीचा संदेश काय? घ्या जाणून. (हेही वाचा, How to Increase Ladki Bahin Yojana Money? लाडकी बहीण योजना, आलेले पैसे कसे वाढवाल? घ्या जाणून)
असं वागणार माझ्याशी? लाडक्या बहिणीचा आर्त सवाल
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नोटेवर पुढीलप्रमाणे संदेश आढळतो: ''गणेश ब्लॉक मधून काढ मला, मी माझे लाडकी बहीणीचे पैसे दिलेत तुला मोबाईलसाठी. तूच आता असं वागणार का माझ्याशी? मला नको रे सोडू, मला एक तरी कॉल कर. वाट बघते. तुझीच सोनाली.'' हा संदेश पाठवणारी कथीत सोनाली आणि गणेश नेमके कोण? याबाबत माहिती मिळू शकली नाही. पण, अवघडंय भाऊ (avaghaday_bhau) नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर याबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभावर पाणी, अनेक महिलांचे अर्ज बाद; जाणून घ्या सविस्तर)
ती म्हणते 'एकता तरी कॉल कर'
View this post on Instagram
लेटेस्टली मराठीकडून पडताळणी
लेटेस्टली मराठीने avaghaday_bhau नावाच्या इंन्स्टाग्राम पेजची पडताळणी केली असता, पैशांच्या नोटेवर अशाच प्रकारचे संदेश लिहिलेल्या इतरही अनेक नोटांसदृश्य कागद आढळून आले. त्यावरील संदेश खालील प्रमाणे:
'शुभम, मला घेऊन चल'
View this post on InstagramA post shared by [ अवघडय भाऊ || Memer ] (@avaghaday_bhau)
ज्यामध्ये ''माझ्या मोबाईल दादाने तोडला आहे. मला एकटीला घराबाहेर सोडत नाहीत. मी नाही राहू शकत तुला सोडून. शुभम, मला घेऊन चल. प्लीज. तुझी वाट बघते. -तुझी निकीता.
'कॉलेजमागे भेटते तुला'
View this post on InstagramA post shared by [ अवघडय भाऊ || Memer ] (@avaghaday_bhau)
तुझा पैसा नको मला. अनिकेत तूझं प्रेम पाहिजे. बस मागे नको येऊ. कंडक्टर मामा आहे माझा. कॉलेज मागे भेटते तुला. तुझीच ज्योती.
'सागर माझं लग्न झालंय'
View this post on Instagram
सागर माझं लग्न झालंय तू एकदा तरी मला भेटायला ये. मी वाट बघत आहे. तुझीच पूजा.
लेटेस्टली मराठीने केलेल्या पडताळणीत या पेजवर वरीलप्रमाणे पोस्ट आढळून आल्या. यावरुन काही बाबी स्पष्ट होतात. पहिले म्हणजे सोशल मीडियावर मिम्स तयार करुन ते व्हायरल करण्याच्या हेतूने हे पेज तयार करण्यात आले असावे. दुसरे असे की, समाजामध्ये वास्तवात घडणाऱ्या विसंगती, विनोदी बाबी हेरुन त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात असाव्यात. त्यामुळे व्हायरल झालेल्या संदेशातील मजकूरात आणि प्रकरणातील तथ्याबाबत लेटेस्टली मराठी कोणताही दावा करत नाही. कारण अशा प्रकरणांची पुष्टी होऊ शकली नाही.