Ladki Bahin Yojana Installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची (Ladki Bahin Yojana Installment) राज्यातील सर्व पात्र महिला वाट पाहत आहेत. या महिलांसाठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी लाडकी बहिन योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. डिसेंबरची रक्कम हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दिली जाईल, असं फडणवीस म्हणाले होते. तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
त्यानुसार आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. आजपासून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. हिवाळी अधिवेशन संपून डिसेंबर महिनाही संपत आला आहे. मात्र राज्याच्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, आजपासून पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. (हेही वाचा -Will Ladki Bahin Yojana Applications be Rechecked? लाडकी बहिण योजना अर्जांची पुनर्तपासणी? काय होणार? घ्या जाणून)
आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा -
लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. दिवाळीपूर्वी जुलै ते नोव्हेंबर या काळात महायुती सरकारने महिलांच्या खात्यात 7,500 रुपये जमा केले. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि आचारसंहिता लागू झाली. या वेळी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या पात्र महिलांनाही योजनेचे सर्व हप्ते मिळणे अपेक्षित आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना होणार बंद? राज्य सरकार आणि कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष)
लाडली बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचे महायुती सरकाचे आश्वासन -
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पानंतर लाभार्थी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या लाभार्थी महिलांना डिसेंबरचा हप्ता म्हणून केवळ 1500 रुपये दिले जाणार आहेत.