Kranti Redkar On Sameer Wankhede: पती समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर पत्नी क्रांती रेडकर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या 'ते तर सर्वांनाच माहिती आहे'
Kranti Redkar, Sameer Wankhede | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Aryan Khan Cruise Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांच्या विरुद्ध CBI ने एफआय आर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये उल्लख आहे की, अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली होती की, जर त्याने ₹ 25 कोटी दिले नाहीत तर त्याचा मुलगा आर्यनला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अडकवले जाईल. समीर वानखेडे यांच्यावर लावलेल्य आरोपांवरुन त्यांच्या अभीनेत्री असलेल्या पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी म्हटले आहे की, त्यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. हे केवळ आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या कारवाईत पूर्ण सहकार्य करत आहोत.

क्रांती रेडकर यांनी पुढे म्हटले आहे की, कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे . आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत. (हेही वाचा, समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप)

ट्विट

दुसऱ्या बाजूला सीबीआय (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) ने आर्यन खान क्रूझ प्रकरणाशी संबंधित कथीत भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. एजन्सीने मुंबई, दिल्ली, रांची (झारखंड) आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथे 29 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमधून कोणत्या गोष्टी पुढे येतात याबाबत उत्सुकता आहे.

ऑक्‍टोबर 2021 मध्ये मुंबईपासून जवळच असलेल्या एका क्रूझ शिपवर आर्यन खान आणि इतरांना कथित अमली पदार्थ प्रकरणात अटक झाल्यानंतर ठळकपणे चर्चेत आलेले वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी गैरवर्तनाचे आरोप आहेत. वानखेडे यांच्यावर दाखल एफआयआरमध्ये सीबीआयने अधिकाऱ्याच्या (वानखेडे) यांचे परदेश दौरे आणि महागड्या मनगट घड्याळांची विक्री आणि खरेदी यांचाही उल्लेख केला आहे.