Arrested | (File Image)

केंद्रीय गुप्तचर ( Central Intelligence) यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या (Maharashtra ATS) संयुक्त पथकाने कोझिकोड रेल्वे आग ( Kozhikode Train Fire) प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. संयुक्त पथकाने आरोपला रत्नागिरी (Ratnagiri ) येथून अटक केली. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केरळ पोलिसांचे एक पथकही रत्नागिरी येथे दाखल झाले आहे. आरोपीला लवकरच केरळ पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने दिली आहे. कोझिकोड जिल्ह्यातील एलाथूरजवळ अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस ट्रेनच्या D1 डब्यात एका प्रवाशाने पेट्रोल ओतून आग लावली. ज्यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले. या प्रकरणातील संशयीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसमध्ये (Alappuzha-Kannur Executive Express) चढलेल्या संशयिताने आपल्या सहप्रवाशांवर पेट्रोल ओतले आणि त्यांना आग लावली. ज्यामुळे D1 कोचमध्ये घबराट पसरली. या घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. कोझिकोडमध्ये रविवारी रात्री तीन जणांचा बळी घेणारी धक्कादायक घटना घडली.

ट्विट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी बॅगेतील बाटलीत पेट्रोल घेऊन जात असल्याने ही घटना पूर्वनियोजित असावी. एका रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या व्यतिरिक्त काही इतर तपास यंत्रणा देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा काही दहशतवादी कारवाईशी संबंध आहेत का याबाबत ते तपास करत आहेत. सध्या इतर कोणतीही अधिक माहिती जारी केली जाऊ शकत नाहीत. तपास सुरू आहे," अधिकारी म्हणाले. एका प्रवाशाच्या जबाबावर आधारित संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.