कोल्हापूर: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांनी लावलं खडी आणि डांबराचं लग्न; वाचा सविस्तर
Kolhapur Potholes Marriage (Photo Credits: Facebook)

लग्न (Marriage) या एकाविषयाशी संबंधित अनेक बातम्या, माहित्या, किस्से आपण आजवर ऐकले, पहिले असतील. दोन प्रेम करणाऱ्या जीवांचे मिलन करणारा हा सोहळा म्हणजे लग्न. पण कोल्हापुरात (Kolhapur) काही नागरिकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी भर चौकात एक अनोखा विवाहसोहळा आयोजित केला होता. नाही.. तुम्ही विचार करताय तसा हा काही माणसांचा विवाह नसून चक्क खडी आणि डांबराचा विवाह होता. कोल्हापुरातील बिंदू चौकात (Bindu Chowk) रस्त्यावरील खड्ड्यांच्या (Potholes) निषेधार्थ हा विवाह लावून देण्यात आला. मागील काही काळात खड्ड्यांमुळे कोल्हापुरात रस्त्यांची अगदी बिकट अवस्था झाली आहे, मात्र तरीही प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष नाही म्ह्णूनच या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी ही अनोखी कल्पना साकारण्यात आली होती. यांनंतरही काही फरक न जाणवल्यास उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करणार असल्याचे सुद्धा वाहन चालल संघटनांचे म्हणणे आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी कार्यकर्ते ‘कोल्हापूर की खड्डेपूर’ अशी पिवळ्या रंगातील टोपी परिधान करुन आले होते तर, बिंदू चौक येथे भर रस्त्यात हा लग्नाचा मांडव उभारला होता. डांबराचे बॅरेल आणि खडीचे पोते यांच्यात आंतरपाट धरून अक्षता टाकून खड्ड्यांची पूजा करण्यात आली इतकंच नव्हे तर मंगलाष्टक म्हणत साग्रसंगीत हा विवाह पार पडला.

MyBMC Pothole FixIt अ‍ॅप च्या माध्यामातून आता मुंबईकर BMC कडे करू शकणार खड्ड्यांची तक्रार

बिंदू चौकातील खडड्याचे लग्न या आंदोलनावेळी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, महाराष्ट्र वाहतुक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, रिक्षा मालक सेना , काळी-पिवळी टॅक्सी युनियन , टेंपो ट्रव्हलर संघटना, यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.