Pothole Fixit app (Photo Credits: Facebook and Twiitter)

मुंबईकर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त त्रस्त असतात ती गोष्ट म्हणजे मुंबई मधील रस्त्यांवरील खड्डे. आता मुंबईकरांना त्यांच्या परिसरातील खड्ड्यांची माहिती प्रशासनाला खास अ‍ॅपच्या माहितीने देता येणार आहे. बीएमसीने आज मुंबईकरांना खड्ड्यांमुळे होत असलेल्या त्रासाची जाणीव असल्याचं एक ट्वीट केले आहे. आता त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने मुंबईकरांना MyBMC Pothole FixIt हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. गूगल प्ले स्टोअरवरून तुम्ही मुंबई पालिका प्रशासनाला तुमच्या नजिकच्या रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती दिल्यास पालिका ते बुजवण्यासाठी तत्परता दाखवणार आहेत. mcgm.mybmcpotholefixit.com.या मुंबई महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरदेखील मुंबईकर खड्ड्यांची तक्रार नोंदवू शकतात. ठाणे येथील खड्डे पुढील 10 दिवसात न बुजवल्यास टोल बंद करणार- एकनाथ शिंदे.

 काही दिवसांपूर्वीच बीएमसीने मुंबईकरांना स्वतःहून खड्डे न बुजवण्याचे आवाहन केले होते. आता अनेक मुंबईकर रस्त्यांच्या दुर्दशेमुळे त्रस्त आहेत. त्यावर उपाय म्हणून आता पालिकेने खास अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने आता नागरिकांना तक्रार नोंदवल्यानंतर तो परिसर लोकेट करता येणार आहे. त्यानंतर तक्रारीचे अपडेटदेखील अ‍ॅपच्या माध्यमातून संबंधितांना मिळणार आहेत. यापूर्वी पालिकेने खास व्हॉट्सअ‍ॅप नंबरदेखील उपलब्ध करून दिले आहेत. त्याच्या माध्यमातून खड्ड्यांची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. खुशखबर! आता मुंबई मधील खड्डे बुजणार 24 तासांत; फक्त पाठवावा लागेल फोटो, जाणून घ्या WhatsApp Number.

बीएमसी ट्वीट

आज मुंबईकर रेडिओजॉकी मलिष्कानेदेखील उपहासात्मक व्हिडिओ बनवत मुंबई खड्ड्यांचं वास्तव प्रशासनासमोर ठेवलं आहे. मुंबई खड्ड्यांमुळे शहरात ट्राफिकची समस्या गंभीर होत आहे. सोबतच अपघातांचेही सत्र वाढले आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींनी मुंबईच्या रस्स्त्यांची झालेली चाळण पाहता त्याच्या दुरूस्तीचं काम लवकरात लवकर हाती घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.