RJ Malishka (Photo Credits: Instagram)

मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात डोकेदुखी ठरणारी एक गोष्ट म्हणजे रस्स्त्यावरील खड्डे! यंदा मुंबईसह राज्यभर नागरिक रस्त्यावरील खड्ड्यांना त्रस्त आहेत. आता यावरूनच आरजे मलिष्काने (RJ Malishka) पुन्हा नवं विडंबनात्मक व्हिडिओ बनवला आहे. मुंबईतील रस्स्त्यांची झालेली चाळण पाहून वधूच्या रूपातील मलिष्का यंदा मुंबईच्या रस्त्यांवरच चाळणीतून नवर्‍यांचा चेहरा पाहून करवा चौथ साजरा करताना दिसत आहे. सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील रस्त्यांची दुर्दशा पाहून काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांनीदेखील पालिकेवर टीका करत रस्स्ते लवकर दुरूस्त करण्याचे आवाहन केले आहे.

मलिष्काने यापूर्वी झिंगाटच्या ट्यूनवरही रस्स्त्यावरील खड्ड्यांवरून बनवलेलं गाणं विशेष गाजलं होतं. आताही हिंदी सिनेसृष्टीतील जुन्या गाण्यांचा वापर करून बनवलेला नवा व्हिडिओ नेटकर्‍यांच्या पसंतीला उतरला आहे. फेसबूक, ट्विटर सह सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे. ठाणे येथील खड्डे पुढील 10 दिवसात न बुजवल्यास टोल बंद करणार- एकनाथ शिंदे

आर जे मलिष्काची उपहासात्मक टीका

आपण चंद्रावर पोहोचलो आहोत आता चंद्रही आपल्यापर्यंत पोहोचला आहे. मुंबईकर आणि खड्ड्यांचं सात जन्माचं नातं आहे. मुंबईकर मलिष्काने नातं जपताना यावर्षीचं करवा चौथचं व्रत तोडत असल्याचं म्हटलं आहे. अद्याप पालिका प्रशासनाकडून अधिकार्‍यांनी मलिष्काच्या व्हिडिओवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांपूर्वी मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. तेव्हा पालिका प्रशासनाने तिच्या घराची तपासणी केली होती.

काही दिवसांपूर्वी बेंगळूरूमध्येही एका नागरिकाने रस्त्यांची दुरावस्था दाखवण्यासाठी स्वतः अंतराळवीराचं रूप धारण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळेसही अंतराळवीर होऊन आपण चंद्रावर चालत असल्याचं त्याने दाखवलं होतं.