कोल्हापूर: चहा दिला नाही म्हणून पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या; आरोपी स्वत:हून पोलिसात हजर
crime | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

पत्नीने चहा करुन दिला नाही, या अत्यंत क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात घडली आहे. शिरोळ (Shirol) तालुक्यातील राजापूरवाडी येथे ही घटना घडली. मंगल रमेश गायकवाड असे मृत पत्नीचे नाव आहे. तर, रमेश गणपती गायकवाड असे पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर रमेश गायकवाड हा स्वत:हूनच पोलीसांच्या स्वाधीन झाला. कुरुंदवाड पोलीस ठाण्यात (Kurundwad Police Station) जाऊन त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

प्राप्त माहितीनुसार, पती रमेश गायकवाड हा घटना घडली त्याच्या आदल्या रात्री रात्रपाळीच्या कामाला गेला होता. रात्रपळीचे काम आटोपून तो सकाळी साडेआकरा वाजता घरी पोहोचला. त्या दिवशी त्याचा उपवास होता. घरी पोहोचलेल्या रमेश याने पत्नीला खिचडी बनवून देण्यास सांगितले. दरम्यान, त्यावरुन दोघांमध्ये भाडण झाले. त्यानंतर काही वेळाने रमेश याने पत्नला चहा बनविण्यास सांगितले. तर, त्यावरुनही दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. भांडण अत्यंत टोकाला गेले. त्यानंतर मी माहेरी जाते असे सांगून पत्नी मंगल घराबाहेर पडली.

घराबाहेर पडलेली पत्नी मंगल ही माहेरी जाण्यासाठी खिद्रापूर-सैनिक टाकळी रस्त्यावरील बस थांब्यजवळ उभी होती. दरम्यान, पती रमेश हा तिला परत बोलविण्यासाठी तेथे आला. तेव्हा तिथेही दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. या भांडणानेही टोक गाठले. संतापलेल्या रमेश याने सोबत आणलेली नायलॉनची दोरी हातात घेतली आणि त्याने पत्नीचा गळा आवळला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा, पुण्यात कॅम्प परिसरात 'ऑनर किलिंग'चा थरार; बहिणीच्या नवऱ्याचा भावाकडून चाकूने वार करून खून)

घटना घडल्यानंतर आरोपी रमेश गायकवाड हा शांत डोक्याने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलीसांना आपण पत्नीचा खुन केल्याची कबुली दिली. आरोपीने स्वत:हुन दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याने पत्नीच्या हत्येसाठी वापरलेली दोरी, पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपड्यांची पिशवी ताब्यात घेतली.