सातव्या फेरीअखेरही महाविकासआडी (Maha Vikas Aghadi) पुरस्कृत काँग्रेस (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी आपले मताधिक्य कायम राखले आहे. सातव्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 31,002 इतकी मतं मिळाली आहेत. तर सुरुवातीपासूनच पिछाडीवर असलेले भाजप उमेदवार सत्यजित कदम (Satyachit Kadam) यांना 21,336 मते मिळाल आहेत. पोस्टल मतांची मोजणी सुरु असल्यापासूनच सत्यजीत कदम पिछाडीवर राहिले आहेत. चौथ्या फेरीचा अपवाद वगळता अद्याप तरी त्यांना आघाडी घेता आली नाही. त्यामुळे सध्यास्थितीत तरी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर महाविकासआघाडीने आपले स्थान बळकट बनवल्याचे चित्र आहे. सध्या 11 वी फेरी मोजून पूर्ण झाली आहे. 11 व्या फेरीतही काँग्रेसच आघाडवीर आहे.
सकाळी आठ वाजलेपासून पोस्टल मतांपासून या मतमोजणीस सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाकडून जयश्री जाधव तर भाजपकडून सत्यजित कदम हे उमेदवार या वेळी रिंगणात आहेत. पोस्टल मतांची मोजणी सुरु असल्यापासूनच भाजप उमेदवार सत्यजित कदम हे पिछाडीवर पाहायला मिळाले. या निवडणुकीत काँग्रेस आणि पर्यायाने महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला. प्रामुख्याने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. हे दोन्ही नेते कोल्हापूरचे असल्याने चुरस वाढली आहे. (हेही वाचा, Kolhapur Election Result 2022: कोल्हापूरच्या जनतेचा कौल कोणाला? विधानसभा पोटनिवडणुकीचा कौल कोणाला?)
कोणत्या फेरीत कोणाला किती मते?
पहिली फेरी
जयश्री जाधव- 4856
सत्यजित कदम- 2719
दुसरी फेरी
जयश्री जाधव- 5515
सत्यजित कदम- 2513
तिसरी फेरी
जयश्री जाधव- 4928
सत्यजित कदम- 2566
चौथी फेरी
जयश्री जाधव- 3709
सत्यजित कदम- 3937
पाचवी फेरी
जयश्री जाधव- 3673
सत्यजित कदम- 4198
सहावी फेरी
जयश्री जाधव- 4689
सत्यजित कदम- 2972
सातवी फेरी
जयश्री जाधव- 31002
सत्यजित कदम- 21336
आठवी फेरी
जयश्री जाधव- 2981
सत्यजित कदम- 3505
नववी फेरी
जयश्री जाधव- 2744
सत्यजित कदम- 2937
दहावी फेरी
जयश्री जाधव- 2868
सत्यजित कदम- 3794
आकरावी फेरी
जयश्री जाधव- 2870
सत्यजित कदम- 2756
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक म्हणजे महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे. दोन्ही बाजूंनी या निवडणुकीसाठी प्रचंड जोर लावण्यात आला होता. महाविकासआघाडीचे अनेक जेष्ठ आणि युवा नेते या वेळी प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातीलही भाजपचे प्रमुख नेते या निवडणुकीत प्रचारासाठी मोठ्या ताकदीने हजर असल्याचे पाहायला मिळाले.