Kolhapur Election Result 2022: भाजपला धक्का, काग्रेसच्या जयश्री जाधव यांना 15 हजारांचे मताधिक्य, विजयाकडे वाटचाल
Jayashree Jadhav | (File Image)

महाविकासआघाडीतील (Maha Vikas Aghadi) मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur Election Result 2022 काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) बाजी मारताना दिसत आहेत. मतमोजणीच्या विसाव्या फेरीअखेर जयश्री जाथव यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. सध्या त्या 15 हजारांची आघाडी घेऊन विजयाकडे आगेकूच करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार सत्यजित कदम मात्र मोठ्या फरकाने पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. पुरोगामी विचार मानणाऱ्या कोल्हापूरात हिंदुत्त्ववादी विचारांवर प्रथमच निवडणूक लढवली गेल्याचे पाहायला मिळाले. भाजपने हिंदुत्त्वाचा मुद्दा रेटलाच. परंतू, महाविकासआघाडीकडूनही याच मुद्द्यांवर मतदारांना आकर्शित करण्यासा प्रयत्न करण्यात आले. (हेही वाचा, Kolhapur Election Result 2022: कोल्हापूरमध्ये भाजपला धक्का, 11 व्या फेरीतही काँग्रेसच्या जयश्री जाधव आघडीवर, सत्यजित कदम आघाडी घेणार का?)

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच जयश्री जाधव यांनी जोरदार आघाडी घेतली. एका फेरीचा अपवाद वगळता भाजप उमेदवाराला एकदाही आघाडी घेता आली नाही. प्रत्येक फेरीत भाजप उमेदवार पिछाडीवरच पाहायला मळाला. शेवटची अद्यावत माहिती हातील आली तेव्हा बाविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15,525 मतांनी आघाडीवर होत्या. बाविसाव्या फेरीत जयश्री जाधव यांना 3529 तर त्यांच्या विरोधात असलेल्या सत्यजीत कदम यांना 3226 मते मिळाली. मतमोजणीसाठी एकूण 26 फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी 22 फेऱ्या मोजून पूर्ण झाल्या आहेत. अद्याप 23 हजार 705 मतांची मोजणी बाकी आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार चंद्रकांत जाधव निवडून आले होते. मात्र कोरोना काळात त्यांचे निधन झाले. त्यामुले दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना महाविकासआघाडीच्या वतीने रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे भाजपने सत्यजित कदम यांच्या रुपात दिलेला उमेदवार पाठिमागच्या वेळी काँग्रेसकडून रिंगणात होता. त्याच कदमांना भाजपने पोटनिवडणुकीत तिकीट दिले. महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना प्रचाराच्या रणधुमाळीत पाहायला मिळाला.