कोल्हापूर (Kolhapur ) येथून एक खळबळजनक वृत्त आहे. कोल्हापूर अंबाबाई मंदिर (Ambabai Temple Kolhapur) परिसरात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीमुळे कोल्हापूर पोलीस सतर्क झाले आहेत. फोनची दखल घेऊन कोणताही धोका न स्वीकारता मंदिर परिसरात कसून चौकशी सुरु आहे. बॉम्बशोधक पथकाकडून बॉम्बचा शोध घेतला जात आहे. देविचे दर्शन भाविकांसाठी तूर्तास बंद ठेवण्यात आले आहे. पोलिसांची मोठी कुमक अंबाबाई मंदिर परिसरात तैनात झाली आहे. एक ते दीड तासापूर्वी अज्ञाताने फोन (Kolhapur Bomb Threat Call) करुन महालक्ष्मी मंदिर (Mahalaxmi Temple Kolhapur) म्हणजेच कोल्हापूर अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple ) बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली.
घटस्थापनेचा दिवस (7 ऑक्टोबर) असल्याने भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच रांगा लावूनहोते. त्यातच कोरोना महामारीमुळे गेले प्रदीर्घ काळ बंद असलेले मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहयाला मिळत होती. आतापर्यंत सकाळपासून सुमारे हजारो भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. अद्यापही दर्शनासाठी मोठी रांग पाहायला मिळत होती. दरम्यान, बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली आणि एकच धावपळ उडाली.
दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरात खरोखरच बॉम्ब ठेवला आहे का? याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. दुसऱ्या बाजूला हा फोन नेमका कोठून आला. या फोनमधील माहितीत किती तथ्य आहे. तसेच, या सगळ्यामागे असलेला मुख्य आरोपी कोण आहे? याचाही तपास सुरु आहे.