Kishori Pednekar on Kangana Ranaut: 'दो टके के लोग' कोर्टाला राजकीय आखाडा बनवू पाहतायत, महापौर किशोर पेडणेकर यांची कंगना रनौत हिच्यावर टीका (Video)
Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

Kishori Pednekar on Kangana Ranaut:  बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत हिच्या बंगल्यासह कार्यालयावर महापालिकेने जी कारवाई केली होती त्यासंदर्भात आज निर्णय कोर्टाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार कोर्टाने कंगनाच्या बाजूने आपला निकाल दिला असून तिने आनंद व्यक्त केला आहे. मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर त्या एक बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभुमीवर आता किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा कंगना रनौत हिच्यावर टीकास्र सोडले आहे. त्या मीडियाशी बोलताना अशा म्हणाल्या की, 'ये दो टके के लोग' म्हणजेच कंगनाचे नाव न घेता त्यांनी तिच्यावर टीका केली आहे.(Kangana Ranaut Property Demolition Case: कंगना रनौत हिच्या प्रॉपर्टीवरील तोडक कारवाई बेकायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा BMC ला झटका)

किशोरी पेडणेकर यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, सगळ्यांनाच धक्का बसला आहे की जी अभिनेत्री हिमाचल प्रदेशात राहते आणि येथे येऊन मुंबईला POK म्हणते. अशा दोन टक्क्यांची लोक कोर्टाला राजकीय आखाडा बनवू पाहतायत. हे अगदी चुकीचे आहे.(Kangana Ranaut Property Demolition Case: आम्ही जे काही केले ते नियमांप्रमाणेच- महापौर किशोरी पेडणेकर)

तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर कंगना रनौत हिने बॉलिवूडमधील अनेक मुद्दांवर बेधडक भाष्य केल्याचे दिसून आले आहे. तसेच मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर ही ट्विट्सच्या माध्यमातून वेळोवेळी निशाणा साधला. मात्र मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर हा वाद अधिकच पेटला गेला. त्यामुळे महापालिकेने कंगना रनौत हिच्या घरासह कार्यालयावरीतील अवैध कामांवर हातोडा मारला. या सगळ्यात 2 कोटीचे नुकसान झाले असून त्याची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी करणारी याचिका कंगनाने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.