नाशिक ते मुंबई पर्यंत किसान लॉंग मार्च (Kisan Long March) अखेर स्थगित करण्यात आल्याची घोषणा शेतकरी नेते जे पी गावित यांनी केली आहे. गावित यांच्या माहितीनुसार, शेतकर्यांच्या लॉंग मार्च मुंबईमध्ये धडकणार नाही. शहापूरच्या वाशिंद (Vashind) मधूनच तो माघारी परतणार आहे. त्यामुळे आंदोलक शेतकरी आता आपल्या घरी परतण्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकारकडून आम्हांला आश्वस्त करण्यात आले आहे त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये कांदा उत्पादकांना तात्काळ 600 रुपये प्रति क्विंटलची आर्थिक मदत, सतत 12 तास वीजपुरवठा आणि शेतकरी कर्जमाफी आदींचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यामध्ये बैठक झाली. त्यामध्ये 70% मागण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तर उर्वरित मागण्या विचाराधीन आहेत. त्यावर सरकार मार्ग काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहे असे सांगण्यात आले आहे. विधिमंडळात काल मुख्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. सरकारकडून जीआर निघत नाही तोपर्यंत मागे न फिरण्याचा शेतकर्यांचा निर्धार होता. त्यानंतर आज जिल्हाधिकार्यांकडून सरकारी आश्वासनाची प्रत हाती आल्यानंतर अखेर शेतकर्यांनी लॉंग मार्च मागे घेतल्याची माहिती दिली आहे.
पहा ट्वीट
Farmers have decided to end their agitation and have cancelled their March towards Mumbai. Protesting farmers have started to return from Shahpur to their respective places. We have decided it after govt's assurance to us: JP Gavit, Farmer leader told ANI
(file pic) pic.twitter.com/Gz9hdypAlg
— ANI (@ANI) March 18, 2023
काल रात्री या लॉंग मार्च मधील एका शेतकर्याचं प्रकृती ढासळल्याने निधन देखील झाले आहे. मंत्री दादा भुसे यांनी या वृत्ताची दखल घेत त्यांच्या कुटूंबियांना 5 लाख मदत जाहीर केल्याचंही सांगितलं आहे.
5 दिवस उन पावसात पायपीट करून शेतकरी नाशिक मधून मुंबईच्या दिशेने आले होते. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. मागील 2 दिवस वाशिंद मध्ये मुक्काम केल्यानंतर आता शेतकर्यांना घरी पोहचवण्यासाठी सरकार कडून एक ट्रेन देखील बूक करण्यात आली आहे.