Kirit Somaiya & CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI/FB)

ठाकरे सरकारवर (Thackeray Government) विरोधकांकडून सातत्याने टीका होत असते. भाजप नेत्यांकडून तर वेळोवेळी राज्य सरकारला लक्ष्य केले जाते. यात भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांचे नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावे लागेल. आताही महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त त्यांनी सरकारला 10 प्रश्न विचारले आहेत आणि ठाकरे सरकारकडे त्याची उत्तरे मागितली आहेत. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'ठाकरे सरकार उत्तर द्या' वर्षपूर्ती निमित्त माझे 10 प्रश्न. पुढे ट्विटमध्ये त्यांनी 10 प्रश्न विचारले आहेत. (Kangana Ranaut Property Demolition Case: मुंबई महापौर आणि पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा; किरीट सोमय्या यांची मागणी)

1. तुमच्या आणि रविंद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी 30 जमिनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केल्या. तुमचे नाईक आणि वायकर कुटुंबियांसोबत नेमके कोणते संबंध आहेत?

2. तुमच्या इलेक्शन अॅफिडेव्हीटमध्ये कर्जतमध्ये 3 जमिनींची तुकडे असल्याचे म्हटले आहे. ही चूक आहे की खोटं?

3. दहिसरमधील 7 एकर जागा बीएमसीने विकत घेतली असून यासाठी 349 कोटी किंमत मोजली आणि त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी बिल्डर 900 कोटींची मागणी करत आहेत, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. परंतु, बिल्डरने ती जागा फक्त 2.55 कोटींना विकत घेतली आहे.

4. कोविडच्या नावाखाली 12000 कोटींचे 5000 बेड हॉस्पिटल स्कॅम बीएमसी/तुमच्याकडून करण्यात आला.

5. वरळी येथे गरीबांना देण्यात आलेले एक डझन फ्लॅट्स महापौर किशोरी पेडणेकर यांनी हडप केले.

6. ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांनी म्हाडाची जमिन बळकावली आणि वांद्रे येथे अनधिकृत ऑफिस बांधले.

7. कारशेडची जागा बदलल्याने मेट्रोला 5 वर्ष उशीर होणार असून 5000 कोटी अधिक खर्च होणार आहेत.

8. कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय उचित नसल्याचे मनोज सौनिक समितीने म्हटले आहे. मग तुम्ही त्यावर रिपोर्ट का नाही रिलीज करत?

9. तुमचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 69 SEA डेव्हलपर्सकडून पैसे उकळण्यासाठी एनजीओ चा ब्लॅकमेलिंगसाठी वापर केला.

10. ठाकरे सरकारकडून झालेल्या कोविड रुग्णांची गैरसोय आणि भष्ट्राचारामुळे मे 2020 मध्ये 14000 मृत्यू झाले. ही संख्या मे 2019 मध्ये 7000 इतकी होती.

Kirit Somaiya Tweet:

यापूर्वी अर्णब गोस्वामी, कंगना रनौत, प्रताप सरनाईक अशा विविध प्रकरांमध्ये किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. तसंच टीकेची एकही संधी न सोडता सोमय्या सरकारच्या कामकाजावर, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत असतात.