Photo Credit - Facebook

Kalyan  Lok Sabha Constituency:कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha 2024) हायव्होल्टेज लढतीकडे राज्यासह देशाच लक्ष लागलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध शिवसेना असा रणसंग्राम आहे. शिंदे गट (Shinde Group) विरुद्ध ठाकरे गट (Thackeray Group) असा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यापुढे वैशाली दरेकर यांचे आव्हान आहे. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा लढवत आहेत. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर(Vaishali Dareker) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. (हेही वाचा: Baramati Lok Sabha Elecion 2024: बारामतीत नणंद विरूद्ध भावजय लढत; मतमोजणीला सुरूवात होताच सुप्रिया सुळे पिछाडीवर, अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला )

2009 मध्ये वैशाली दरेकर यांनी शिवसेनेतून त्यांच्या राजकीय कार्किदीला सुरूवात केली. परंतू 2009 मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेमधून त्यांनी 2009 ची कल्याण लोकसभा निवडणूक लढली होती. त्यात त्यांना एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. वैशाली दरेकर 2010 मध्ये कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसे तर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. यापूर्वी वैशाली दरेकर यांनी विरोधी पक्षनेता म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कामं केलं आहे. त्यानंतर वैशाली दरेकर मनसे सोडून पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेल्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेत उद्धव ठाकरे गटात राहिल्या. त्यांना लोकसभा निवडणुक 2024साठी उमेदवारी देण्यात आली.