Kalyan Viral Video (Photo Credits-Twitter)

Kalyan: कल्याण मधील कोळसेवाडीतील एक धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यानुसार या ठिकाणी रिक्षाचालकाकडून मुलीची छेडछाड काढली गेली. त्यामुळे तिने आपल्या दोन मित्रांना मदतीसाठी बोलावले असता उलट त्या दोघांसह तिला स्थानिकांनी मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अद्याप कारवाई सुद्धा करण्यात आलेली नाही असे सांगितले जात आहे.(Mumbai Police: मुंबईत 40 लाखांच्या चरससह एका व्यक्तीला अटक)

तरुणीने उल्हासनगर येथून डोंबिवलीकडे जाण्यासाठी एक रिक्षा पकडली. त्यावेळी रिक्षाचालकाने तिच्यासोबत छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने आपल्या दोन मित्रांना मदतीसाठी बोलावले ते दोघे ही आले. तेव्हा दोन मित्र आणि रिक्षाचालकामध्ये बाचाबाची झाली. मात्र या प्रकरणी मुख्य आरोपीला धडा शिकवण्याऐवजी मदतीसाठी पोहचलेल्यांसह तरुणीला पट्टाने स्थानिकांनी मारले. याचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.(Mumbai: बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या गाडीतून उडी मारुन फरार)

Tweet:

व्हायरल झालेल्या व्हिडिओ स्थानिकांनी दोन तरुणांसह तरुणीला मारहाण केलीच पण शिवीगाळ सुद्धा करण्यात आली आहे. तरुण हात जोडून मारु नका असे सांगत असले तरीही काहींनी त्यांना मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व एकूणच प्रकार संतापजनक असून लवकरात लवकर यावर कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे.