![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/2020-01-29-2-380x214.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे एका कोरोना लागण झालेल्या पोलिसांच्या संपर्कात आळ्याने त्यांना आता 14 दिवस होम क्वारंटाईन (Home Qurantine) मध्ये राहण्यास सांगितले आहे. आव्हाड यांची प्राथमिक कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे मात्र तरीही नियमानुसार त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशावेळी चिंतेचे वातावरण असताना एका फोनने त्यांना खूप बळ दिल्याचे म्हणत त्यांनी फेसबुक वर एक भावनिक पोस्ट केली आहे. हा फोन म्हणजे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा होता. नुकतीच शरद पवार यांनी फोनवर आव्हाडांची चौकशी केली. या एका फोनमुळे बळ मिळाल्याचे म्हणत आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. मुंबई: धारावी मध्ये आढळले 5 नवे COVID-19 रुग्ण, या परिसरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 60 वर
जितेंद्र आव्हाड पोस्ट
अचानक साहेबांचा फोन आला. आवाजामध्ये एक माया, आपलेपणा, काळजी हे सगळ दिसत होत. जितेंद्र कसा आहेस. मी म्हटल साहेब सगळ ठिक आहे. नक्की ना माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. मी म्हटल नाही साहेब. सगळ्या कार्यकर्त्यांची काळजी घे आणि आता थोडासा घरी राहून लढाई लढ. मग म्हटल साहेब ८० हजार खिचडी वाटपाच काय करायच. त्यावरती ते काहीच बोलले नाहीत. शांत पण अस्वस्थ
गरीबा बद्दल त्यांची तळमळ आम्ही ओळखुन आहोत
पण, साहेब तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने आजारी असताना देखील आमची लढाई लढत होतात. आतातर ही महाराष्ट्राच्या जनतेची लढाई आहे. प्रसंग बाका आहे, पण शरणागती घेता येणार नाही.
तुमचेच संस्कार
लोकांसाठी लढायचे
एक फोन आणि जादू झाली
आशीर्वाद असावेत!
याशिवाय दुसऱ्या एक पोस्ट मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी या एकूण प्रसंगाची सविस्तर माहिती दिली आहे. आपण कळवा मुंब्रा मतदारसंघातील नागरिकांसाठी खिचडी वाटप करणार होतो. मात्र आता घरी बसावे लागल्याने ही मदत कशी पोहचवणार हा प्रश्न आहे. यावेळी सहकारी आणि नागरिक आपल्यावर प्रेम आणि विश्वास दाखवून आहेत मात्र काहींना कुचाळक्या करण्यातून उसंत नाही अशा आशयाची भावना मांडणारी ही दुसरी पोस्ट आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात असलेल्या 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती माध्यमातून प्रसारित केली जात आहे . यावेळी खबरदारीचा पर्याय म्ह्णून अनेक पोलीस अधिकारी आणि एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं आहे.