महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील 308 जागा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत धारावी (Dharavi) परिसरात आढळले आहेत. या परिसरात 5 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या परिसरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 60 वर पोहोचली आहे. यात 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. मुंबईतील अनेक ठिकाणे कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यता आली आहेत.
राज्यात कोरोना विषाणूमुळे एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू झाला असून, 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 new #Coronavirus positive cases reported in Dharavi. The total number of positive cases in the area have now risen to 60 (including 7 deaths): Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Mumbai pic.twitter.com/2gWQs3HhA0
— ANI (@ANI) April 15, 2020
हेदेखील वाचा- भारतात 1076 नवीन कोरोना बाधितांसह देशात COVID-19 रुग्णांची एकूण संख्या 11,439- आरोग्य मंत्रालय
तर भारतात नवे 1076 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची संख्या 11,439 वर जाऊन पोहोचली आहे. यात गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा आकडा खूपच धक्कादायक असून कोरोनाचा कहर संपूर्ण देश सहन करत आहे. ताज्या माहितीनुसार, 11,439 रुग्णांमध्ये 9756 रुग्ण सक्रिय केसेस असून 1306 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर एकूण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.