
काही लोक राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसांत तुम्हाला राज ठाकरेंनंतर ओवेसींची एंट्री पाहायला मिळेल. राज्यात जातीय तेढ आणि अनुचित घटना घडवून आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत घेतलेली भूमिका आणि केलेले वक्तव्य यावर प्रसारमाध्यमांनी विचारले असता जयंत पाटील बोलत होते.
राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. मुंबईतील सभेनंतर ठाणे येथील सभेतही राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला. येत्या तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढा. अन्यथा या मशिदींवरील भोंगे आम्ही हटवू तसेच, ज्या ज्या वेळी तिकडे अजान होईल तेव्हा तेव्हा इकडे भोंग्यांवर हनुमान लावल्या जातील, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पटण केले. मनसेला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारण आता एका वेगळ्या वळणार येऊन ठेपले आहे. (हेही वाचा, Raj Thackeray in Pune: हनुमान जयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे येथे महाआरती)
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर महाविकासआघाडीतील नेत्यांकडूनही जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वादावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राचे औवेसी अशी संभावाना केली. यावरुन आक्रमक झालेल्या मनसेकडून दैनिक सामना कार्यालयाबाहेर पोस्टरबाजी पाहायला मिळाते आहे. ''तुम्ही ओवेसी कोणाला बोलला? संजय राऊत (Sanjay Raut) , आधी तुम्ही तुमचा लाऊडस्पीकर बंद करा'', असा इशारा या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. हे पोस्टर नेमके कोणी लावले याबाबत माहिती मिळू शकली नाही. संजय राऊत यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पाठीमागील 50 वर्षे असे इशारे देतच आम्ही पुढे गेलो आहोत. त्यामुळे आता त्यांनी जाऊन 'केला इशारा जाता जाता' हा चित्रपट पाहायला हवा, असा मिष्कील टोलाही संजय राऊत यांनी मनसेला लगावला आहे.
Deliberate attempt to create communal tension in the state. In coming days you'll see entry of Owaisi in picture,after Raj Thackeray. It's an attempt to start communal rift & untoward incidents in the state: Maharashtra NCP chief Jayant Patil on Raj Thackeray's loudspeaker remark pic.twitter.com/oneRUXiw99
— ANI (@ANI) April 16, 2022
दरम्यान, मनसे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे (Pune) येथे महाआरती (Maha Aarti) होणार आहे. राज्यभरात आज (16 एप्रिल) हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो आहे. या उत्सवाचे औचित्य साधत राज ठाकरे पुण्यात महाआरती करणार आहेत. दरम्यान, महाआरतीच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुणे येथे कालच दाखल झाले आहेत. पुणे येथी खालकर चौक परिसरात असलेल्या हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti) औचित्य साधत मारुती मंदिरात ही मआआरती पार पडेल. मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी मनसेने पुकारलेल्या आंदोलनाचा हा श्रीगणेशा असल्याचा अर्थ या महाआरतीतून काढला जातो आहे.