Janta Curfew In Parbhani: परभणीत आजपासून 5 दिवस जनता कर्फ्यू, कामाशिवाय घराबाहेर पडल्यास होणार कारवाई
Coronavirus Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

Janta Curfew In Parbhani:  महाराष्ट्रातील परभणीत 5 दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. पण हा जनता कर्फ्यू शुक्रवारी की शनिवार पासून सुरु होणार याबद्दल गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचे अधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, 5 दिवसांसाठी जनता कर्फ्यू हा शनिवार पासून लागू करण्यात येणार आहे. तर कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.(COVID-19 Vaccine Update: आजपासून मुंबई मधील केईएम हॉस्पिटलमध्ये Oxford-AstraZeneca च्या कोविड-19 वरील लसीच्या चाचण्यांना सुरुवात)

शुक्रवारी परभणी येथे काही दुकाने बंद असल्याचे दिसून आले. तर काही जण निष्काळजीपणाने फिरताना ही दिसले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4987 वर पोहचला आहे. त्यापैकी 170 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तसेच 3551 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1266 वर अद्याप उपचार सुरु आहेत. नागरिकांकडून कोरोनाचे नियम मोडल्यास दंड वसूल करणे किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी हा कर्फ्यू जनजागृतीसाठी असणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र डर नागरिकांनी मास्क न घातल्यास घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करु असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

जिल्हा प्रशासनामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, सोनपथ आणि गंगाखेड तालुक्यात यशस्वीपणे जनता कर्फ्यू पार पडला. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा सुद्धा कमी झाल्याचे दिसून आले आहे. याच कारणास्तव आता संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुगळीकर यांनी म्हटले आहे.(Coronavirus Plasma Therapy: कोरोना व्हायरस उपचारांसाठी किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध; जाणून घ्या राज्य सरकारने निश्चित केलेली प्रति बॅग किंमत)

जनता कर्फ्यूच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु असणार आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्तींना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पोलिसांमधील एका सुत्राने असे म्हटले की, जनता कर्फ्यूसाठी कठोर बंदोबस्त ठेवला जाणार नाही आहे. पण नागरिकांना मात्र नियमांचे पालन करावे लागणार आहे.