प्रवासी बस दरीत कोसळून (Bus Falls Into Gorge) झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) राज्यातील राजौरी (Rajouri) येथील भींबर गलीजवळ घडली. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेत बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींची संख्या समजू शकली नाही. मात्र, या बसमध्ये अनेक प्रवासी होते. ही बस खोल दरीत कोसळी. मदत आणि बचाव कार्य पोहोचे पर्यंत चौघांचा मृत्यू झाला होता, असे स्थानिकांनी सांगितले.
मांजकोटचे तहसीलदार जावेद चौधरी राजौरी जिल्ह्यातील भींबर गलीजवळ अनेक प्रवाशांना घेऊन जाणारी बस आज सकाळी खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही काही लोक खाली खोल दरीत आडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे.
दरम्यान, अशीच एक घटना काल (बुधवारी, 14 सप्टेंबर) जम्मू कश्मीरमधील पुंछ येथे घडली. सावजियानहून मंडीकडे जाणाऱ्या मिनीबसला अपघात घडला. या अपघातात किमान 11 जण ठार आणि 26 जण जखमी झाले.
जम्मू आणि कश्मीर हा भाग हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये मोडतो. त्यामुळे सहाजिकच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्वतरांगा आहेत. अशा वेळी या पर्वतरांगांमधून असलेल्या रस्त्यांवरुन वाहन हाकताना वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागते. क्षणाक्षणाला बदलणारे तापमान, हाडं गोठवणारी थंडी आणि सातत्याने करावा लागणारा हिमवर्षावाचा सामना. या सर्वांमुळे या भागात वाहन चालवणे अधिकच जिकीरीचे होऊन बसते. वाहन चालक हा स्थानिक आणि अधिक प्रशिक्षीत असेल तर अधिक सोयीचे होते. अन्यथा थोडी जरी चूक झाली तरी मोठ्या नुकसाणीला सामोरे जावे लागू शकते, असे स्थानिक सांगतात.