आजकालचं जग सार्याच पातळींवर अधिक स्पर्धात्मक झालं आहे. नुकताच जेईई मेन्स परीक्षेचा पहिल्या सत्राचा निकाल (JEE Mains Exam Result) जाहीर झाला आहे. 23 जणांना 100% गुण मिळाले आहेत. पण या परीक्षेत अपयश हाती आलेल्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. ही घटना जळगाव (Jalgaon) मधील आहे. 18 वर्षीय यश खर्चे (Yash Kharche) परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू न शकल्याने खचला होता. अशातच त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यश जळगावामध्ये मेहरूण च्या जोशीवाडा परिसरामध्ये कुटुंबासोबत राहत होता. मेहरूण च्या राज विद्यालयामध्ये त्याने 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्याने जेईई ची परीक्षा दिली होती. पण अपेक्षित मार्क मिळवू न शकल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्याचे मामा सांगतात. मंगळवारी रात्री यश जेऊन वरच्या खोलीत गेला होता. बराच वेळ तो खाली न आल्याने आई त्याला बघायला वर आली. आतून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. कुटुंबियांनी दार तोडले तेव्हा यश मृतावस्थेत आढळला. JEE-Main 2024 Result: जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर; jeemain.nta.ac.in वर पहा स्कोअर कार्ड .
मुलाला गळफास घेतलेले पाहून यशच्या कुटुंबियांना धक्का बसला होता. त्याच्या आईने मुलाला मृतावस्थेत पाहून मोठा अक्रोश केला. त्यानंतर आजुबाजूची मंडळी धावत आली. यशला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. एमआयडीसी पोलिस ठाण्यात यशची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.