परभणी: 1 जानेवारीला जन्मलेल्या चिमुकलीला जिलेबी दुकानदाराने दिले सोन्याचे नाणे; पिता-पुत्रांचा मागील 10 वर्षांपासून हा उपक्रम सुरु
Baby Girl (Photo Credits: File)

एखाद्या घरात मुलगी जन्माला आली की 'धनाची पेटी' आली असे अनेक लोक म्हणतात. मुलीला लक्ष्मी मानणा-या या समाजात स्त्री-भ्रूण हत्येचे वाढत प्रमाण लक्षात घेता परभणीतील एका जिलेबी दुकानदाराने 1 जानेवारी 2020 ला जन्मलेल्या एका मुलीला 1 ग्रॅम सोन्याचे नाणे भेट म्हणून दिले आहे. इतकच नव्हे तर त्याने 1 जानेवारीला परभणीतील (Parbhani) जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन या दिवशी जन्मलेल्या 11 मुलींच्या पालकांना 2 किलो मोफत जिलेबी दिली आणि लकी ड्रॉ काढून भाग्यवान विजेतीला सोन्याचे नाणे दिले. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, परभणीतील या जिलेबी विक्रेत्याने आणि त्याच्या वडिलांनी गेल्या 10 वर्षांपासून हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.

परभणी शहरातील बसस्टँड रोडवर असलेल्या हरियाणा जिलेबी सेंटरचे मालक धर्मवीर दामोदर व त्यांचा मुलगा सनीसिंग उर्फ मनमोहन दामोदर हे गेल्या 42 वर्षांपासून परभणीकरांना गरमागरम जिलेबीची सेवा देतात. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातून सुद्धा नागरिक ही खास जिलेबी खाण्यासाठी येतात. यासोबत मागील नऊ वर्षांपासून सनीसिंग हे एक अनोखा उपक्रम राबवत आहेत. 1 जानेवारीला खासगी व जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मास आलेल्या कन्यारत्नास दोन किलो जिलेबी मोफत देतात. Savitribai Phule Jayanti 2020: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचे विविध पैलू मांडणारे '10' अनमोल गोष्टी

मात्र या वर्षी त्यांनी या उपक्रमात एक नवीन प्रकार जोडला. ज्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 जानेवारी मध्यरात्री 12 वाजेनंतर जन्मास आलेल्या 11 कन्यारत्नांच्या पालकांना दोन किलो जिलेबी तर वाटप केलीच, पण सर्वांच्या नावाने जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिकेच्या हस्ते एक लकी ड्रॉ काढला. या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या हाफीजा शेख शाहरुख यांना एक ग्रॅम सोन्याचे नाणे या ठिकाणच्या डॉ. मोना खान यांच्या हस्ते भेट दिले.

सनीसिंग यांच्या या उपक्रमाचे रुग्णालय तसेच शहरात देखील कौतुक होत आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सनीसिंग आणि त्यांच्या वडिलांना सुरु केलेला हा उपक्रम खरंच खूप स्तुत्यप्रिय आहे.