International Scholarships: 2019-20 आणि 2020-21 या शैक्षणिक वर्षातील परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता मंजूर करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे.
यासंदर्भात समाज कल्याण आयुक्त पुणे यांना राज्य शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आला आहे. त्यानुसार, शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता देण्याच्या या निर्णयास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयानुसार, 2019-20 आणि त्याआधीच्या वर्षामध्ये परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड होऊन परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले व सध्या शिक्षण सुरू असलेले विद्यार्थी सद्यस्थितीत परदेशात राहून ऑनलाईन शिक्षण घेत असतील त्यांना फेब्रुवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या सत्रासाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता मंजूर करण्यात आला आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 275 जणांचा मृत्यू)
परदेशातील विद्यापीठात २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी #COVID_19 मुळे परदेश किंवा भारतातून ई-शिक्षण घेत असतील तर त्यांनाही फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२० साठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी,निर्वाह भत्ता मिळणार-सामाजिक न्यायमंत्री @dhananjay_munde pic.twitter.com/IIB1URjktj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 8, 2020
याशिवाय 2019-20 मध्ये निवड झालेले परंतु, सद्यस्थितीत भारतात राहून किंवा भारतात परत येऊन पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना 2020-21 च्या पहिल्या सहामाहिसाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी मंजूर करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जे विद्यार्थी भारतात परत येण्यास इच्छुक असतील त्यांना ते ज्या दिनांकास परत येतील तोपर्यंतचा निर्वाहभत्ता व येण्या-जाण्याचे नियमानुसार विमान प्रवास भाडे देखील देण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.