Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आज राज्यात 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 275 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 इतका झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 17 हजार 367 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात आज 11 हजार 81 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 3 लाखाहून अधिक जणांची कोरोना विरोधातील झुंज यशस्वी ठरली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 62.26 टक्के इतका झाला आहे. (हेही वाचा - Coronavirus: बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश)

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 3.45 टक्के इतका आहे. सध्या राज्यात तब्बल 9 लाख 89 हजार 612 जणांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच 35 हजार 625 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. यासंदर्भात राज्यात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.