Sahil Verma, Navy Missing Sailor (Photo Credits: X)

Indian Navy News: भारतीय नौदलाच्या जहाजावर कर्तव्यावर असलेला खलाशी बेपत्ता (Indian Navy Sailor Missing) असल्याचे वृत्त आहे. साहिल वर्मा असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे. सदर खलाशी 27 फेब्रुवारी रोजी जहाजावरुनच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, जहाजावरुन खलाशी बेपत्ता होण्याची घटना गंभीर मानली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय नौदलाच्या मुंबई मुख्याल असलेल्या वेस्टर्न नेव्हल कमांडने (Western Naval Command) सांगितले की, साहील वर्मा हा खलाशी नौदलाच्या जहाजावरुन बेपत्ता झाला. दरम्यान, खलाशाचा शोध सुरु असून त्याच्या बेपत्ता होण्याचे कारणही शोधले जात आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

साहिल वर्मा जहाजावर कर्तव्यावर

अधिक माहिती अशी की, साहील वर्मा सीमन-II हा भारतीय नौदलाच्या जहाजावर कर्तव्यावर होता. दरम्यान, 27 फेब्रुवारीपासून तो समुद्रात बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदल ताबडतोब जहाजे आणि विमानांसह शोधमोहीम तातडीने राबवली आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागला नाही. ही शोधमोहीम अद्यापही सुरुच असल्याचे नौदलाने आपल्या X हँडलवरील माहितीमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा, E Cash Card: भारतीय नौदल आणि स्टेट बँक ऑफ इंडिया घेऊन येणार खास ई-कॅश कार्ड; ऑनलाइन-ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये काम करणार)

खळबळजनक घटना

दरम्यान, खलाशी बेपत्ता होण्याची घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. ही घटना घडली तेव्हा जहाज आणि समुद्रावर कोणती परिस्थीती निर्माण झाली होती. त्याला काही कारण होते का? जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात तो किती काळ होता? याशिवाय आणखी काही घडले का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. नौदलाच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालात या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Indian Navy Jobs for Women: महिलांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी, विशेष कमांडो म्हणून मिळणार स्थान; वाचा सविस्तर)

एक्स पोस्ट

भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलांची नौदल शाखा आहे आणि ती भारताच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी जबाबदार आहे. देशाची सागरी सुरक्षा सुनिश्चित करणे, सागरी हितसंबंधांचे रक्षण करणे, मानवतावादी सहाय्य करणे आणि आपत्ती निवारण कार्ये चालवणे आणि हिंदी महासागराच्या प्रदेशात आणि त्यापलीकडे नौदल सामर्थ्य प्रक्षेपित करणे या मुख्य उद्देशाने हे जगातील सर्वात मोठे नौदल दल मानले जाते. भारतीय नौदलाचा उगम 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मरीनच्या स्थापनेपासून होतो. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, रॉयल इंडियन नेव्ही भारतीय नौदल बनले. भारतीय नौदलाचे तीन कमांडमध्ये आयोजन केले जाते: वेस्टर्न नेव्हल कमांड (मुख्यालय मुंबईत), ईस्टर्न नेव्हल कमांड (मुख्यालय विशाखापट्टणममध्ये), आणि दक्षिणी नौदल कमांड (कोचीमध्ये मुख्यालय). प्रत्येक कमांड त्याच्या संबंधित क्षेत्रातील कार्यांसाठी जबाबदार आहे.