Photo Credit- X

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed)घटनेनंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका होत आहे. राजकारण्यांसह कलाकर, आणि जनतेतून सरकारवर टीका केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी पुतळा तयार करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. खरतर भारतीय नौदलाने(Indian Navy) हा पुतळा उभारला होता. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित होता. भारतीय नौदलाने घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. (हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed: पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला)

नौदल दिनी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करतील. पथक रवाना झाले आहे. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे. भारतीय नौदलाने आता या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. नौदलाकडून चौकशी करण्याबरोबरच पुतळा तातडीने उभारण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत. (हेही वाचा: 'त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करू'; मालवणच्या राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेवर CM Eknath Shinde यांचे स्पष्टीकरण)

भारतीय नौदलाकडून चिंता व्यक्त

अनावरणानंतर अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत करावाईलाही सुरूवात केली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात आत्तापर्यंत दोन व्यक्तींविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. ठेकेदार आणि आर्टिसरी कंपनीचे मालक जयदीप आपटे तसच स्ट्रक्चरल कंसल्टेंट डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. दोघांवरही भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत 109, 110, 125 आणि 318 (3) (5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.