
Ajit Pawar On Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. अशातचं आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत भारत गप्प बसणार नाही, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ते पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
देश बदलाची वाट पाहत आहे - अजित पवार
यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, 'या घटनेचा बदला कधी घेतला जाईल याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. स्वत: एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन तेथे उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: 'जर पंतप्रधान मोदींनी मला बंदूक दिली, तर मी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना मारण्यास तयार आहे'- Abhijit Bichukale (Video))
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय भारत शांत बसणार नाही-
पुणे: पहलगाम आतंकी हमले पर महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार ने कहा, "कार्यक्रम की शुरुआत में हमने महाराष्ट्र के 6 लोगों सहित उन सभी को श्रद्धांजलि अर्पित की, जिन्होंने दो दिन पहले पहलगाम आतंकी हमले में दुखद रूप से अपनी जान गंवा दी। इस हमले के लिए जिम्मेदार लोगों को उनकी जगह… https://t.co/HOy86ncFHR pic.twitter.com/Ij0H7EIpL8
— ANI_HindiNews (@AHindinews) April 25, 2025
भारत गप्प बसणार नाही -
अजित पवार यांनी पुढे बोलताना म्हटलं की, हा हल्ला इतका भयानक होता की संपूर्ण जगाने या घटनेची दखल घेतली आहे. निश्चितच, तुमच्या आणि आमच्या मनात आहे की या घटनेचा बदला घेतला पाहिजे. भारत बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. 22 एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगामजवळील एका पर्यटन केंद्रावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे. (हेही वाचा -Devendra Fadnavis on Pakistani Nationals: पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंबद्दल सहानुभूती नाही; मुख्यमंत्र्यांनी सुरू केली पाकिस्तानींना हाकलून लावण्याची तयारी)
सिंधू पाणी करार रद्द -
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आणि सिंधू पाणी करार रद्द केला. पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करण्यात आले. तसेच सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आले. पहलगाम हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.