ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) द्वारा गुजरात दंगल 2002 वरती आधारीत प्रदर्शित करण्यात आलेल्या India: The Modi Question या डॉक्युमेंट्रीचा महाराष्ट्र विधानसभेने (Maharashtra Legislative Assembly) निषेध केला आहे. सदर डॉक्टुमेंट्रीच्या निषेधाचा ठराव आल्यानंतर सत्ताधारी पक्षाने तो 25 मार्च रोजी मंजूर केला. देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा आणि धार्मिक फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची टीका निषेध ठरावावेळी करण्यात आली.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या याबाबतचा ठराव सभागृहात मांडला. तो ठराव स्वीकारुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहापुढे मतदानासाठी ठेवाला. या ठरावात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचा निषेध करण्यात आला. या वेळी माहितीपटाद्वारे धार्मिक फूट निर्माण करण्याचा आणि भारताच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका झाली. (हेही वाचा, Rahul Gandhi On Gautam Adani & PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, कोणतीही कारवाई केली तरी लढत राहीन- राहुल गांधी)
India: The Modi Question
भारत: मोदींना प्रश्न (India: The Modi Question) हा माहितीपट बीबीसी द्वारा प्रदर्शित करण्यात आला असून तो दोन भागांमध्ये आहे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना गुजरात राज्यात उसळलेल्या दंगलीबद्दल (2002) या माहितीपटात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. देशातील मुस्लिम अल्पसंख्याकांसोबत नरेंद्र मोदी आणि त्यांची पक्ष आणि संबंदित इतर संघटना यांवरही हा माहितीपट भाष्य करतो. दरम्यान, केंद्र सरकार आणि विविध राज्यांतील राज्य सरकारने तसेच, भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाशी संबंधित संघटनांनी या माहितीपटाच्या भारतातील प्रदर्शनावर तीव्र आक्षेप घेत विरोध केला होता.
ट्विट
Maharashtra Assembly has passed a resolution criticizing the BBC documentary on PM Modi.
— ANI (@ANI) March 25, 2023
बीबीसी काय आहे?
बीबीसी (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) ही युनायटेड किंग्डममधील सार्वजनिक प्रसारमाध्यम कंपनी आहे. जगातील सर्वात जुने राष्ट्रीय प्रसारक आणि टीव्ही, रेडिओ आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी बातम्या, मनोरंजन आणि शैक्षणिक सामग्री तयार करणारी जगातील सर्वात मोठिई मीडिया संस्थांपैकी एक आहे. BBC बातम्या आणि चालू घडामोडींवर निःपक्षपातीपणा आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. त्याचे वृत्त कव्हरेज जगभरात मोठ्या प्रमाणावर अधिक तटस्थ आणि विश्वासार्ह मानले जाते. भारतासह अनेक देशांमध्ये त्याचे वार्ताहर आहेत.