महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देश मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. 1 जून रोजी मान्सून केरळ (Kerala) किनारपट्टीवर दाखल झाला असून आता महराष्ट्रासह मुंबईत (Mumbai) मान्सून (Monsoon) कधी दाखल होणार याची सर्वजण प्रतिक्षा करत आहेत. मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपगनरांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. आजही कल्याण-डोंबिवली मध्ये जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. तसंच आज दिवसभर ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Mumbai Rain Update: मुंबईत आज सकाळपासून पावसाची दमदार हजेरी; पूर्व, पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस)
दरम्यान 8 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून लवकरच मान्सून पूर्व पावसालाही सुरुवात होईल, असेही सांगण्यात आले होते. 8 जूनला महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मुंबईत 11 जून पर्यंत मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला होता.
ANI Tweet:
Maharashtra: Rain lashes several parts of Thane leading to waterlogged streets; visuals from Kalyan road.
India Meteorological Department has predicted partly cloudy sky with one or two spells of rain or thundershowers, for today. pic.twitter.com/fgg4mr5SrM
— ANI (@ANI) June 6, 2020
मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली या ठिकाणी आज मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
Skymet Weather Tweet:
During the next 24 hours, light to moderate rain over interior #Karnataka, Madhya #Maharashtra, #TamilNadu, #Jharkhand, Gangetic #WestBengal, Western Himalayas, #Punjab, #Haryana, #MadhyaPradesh, #Chhattisgarh, #Delhi.#weather #WeatherForecast https://t.co/ARrCUAzVRK
— SkymetWeather (@SkymetWeather) June 5, 2020
दरम्यान पहिल्या पावसाताच मुंबई सह उपगनरातील काही भागात पाणी साचले आहे. मात्र मे महिन्याच्या उकाड्याने हैराण झाल्याने प्रत्येक नागरिकाला मान्सूनचे वेध लागले आहेत.